शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या कानगांवात महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन; ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:15 IST

शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देखंडित वीजपुरवठा सुरु करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी

पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथे  महावितरण कंपनीच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करुन यावेळी ऊर्जामंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली.  

कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. परिणामी शेतकरी व शेती व्यवसाय आर्थिक तोट्यात गेला. तरी देशाला अन्नधान्य, दूध,फळे-फुले पुरवण्याचे महान काम समस्त शेतकऱ्यांनी केले आहे. संपुर्ण जग व कंपन्या उद्योग धंदे कोरोना महामारी मध्ये बंद पडले. पण शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय बंद पडू दिला नाही.

परंतु महावितरण कंपनी मुळे आज कानगाव सहित राज्यभर अनेक शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व समस्यांशी शेतकरी लढत असताना महावितरण कंपनीने शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित करून शेती व्यवसाय बंद पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेलीआहेत तर काही पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनी व संबंधित व्यवस्थेचा आज कानगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. तसेच शासन प्रशासन व महावितरण  कंपनीचे या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ऊर्जा मंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

विद्युत विज वितरण कंपनीने त्वरित वीज पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा. यासाठी 'सुरू करा सुरू करा खंडीत विज पुरवठा सुरू करा, महावितरण कंपनीचा निषेध असो शेतकरी एक जुटीचा विजय असो' या घोषणा आंदोलकांनी दिल्या. खंडीत विज पुरवठा सुरू न केल्यास २६ ऑगस्ट २०२१ पासून बेमुदत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी  पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी, कानगांवचे सरपंच राहुल चाबुकस्वार असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणेFarmerशेतकरीelectricityवीजUday Samantउदय सामंतCentral Governmentकेंद्र सरकार