शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:47 IST

सोलापूरचे करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून घेतले कर्ज

ठळक मुद्देशिंदे हे आधीपासूनच राष्ट्रवादी आणि भाजपशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची भेट टाळली

पुणे: सोलापूरचे करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेतून २२ कोटींचे कर्ज घेतले. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याबद्दल त्यांनी सोलापूरचे अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही केली आहे. मात्र काही उत्तर न आल्याने आज कॅम्पमध्ये असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेसमोर शेतकरी उजनी धरण बचाव समितीचे प्रमुख अतुल खूपसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी  आंदोलन केले. हातात भिकेचा कटोरा घेत त्यांनी हलगी वाजवत आंदोलनाला सुरुवात केली होती.

बँकेकडून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्ज फेडा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू. आशा नोटीसा गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही. अशा वेळी अन्नदात्याने कोणाकडे न्याय मागावा. असा प्रश्नही खूपसे यांनी उपस्थित केला आहे. 

आता बँकेचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहा महिने लागतील. असा अर्ज आमच्याकडे सोपवला आहे. पण  शेतकऱ्यांनी सहा महिने करायचं काय. त्यांच्या पोटपाण्यासाठी कर्ज मिळणे गरजेचे आहे. आमदार संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 

उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची भेट टाळली 

संजय शिंदे यांनी कर्ज घेतल्याचे पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितले होते. शिंदे हे आधीपासूनच राष्ट्रवादी आणि भाजपशी जवळीक साधून आहेत. त्यांचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची भेट टाळली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSolapurसोलापूरMLAआमदारbankबँक