शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 16:44 IST

भोडणी येथील शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा झाला होता.

इंदापूर  : भोडणी येथील शेतकरी कांतीलाल गणपत खाडे (वय ५९ )  गुरुवारी  (दि.५ ) सकाळच्या दहा वाजण्याच्या वेळीस भोडणी येथील राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यातील  पत्र्याच्या अँगलला कर्ज फेडता येत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोडणी येथील शेतकरी कांतीलाल गणपत खाडे यांच्या कुंटुंबावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा झाला होता. हे कर्ज फिटत नसल्याने  आत्महत्या केली आहे असल्याची माहिती त्याचे भाऊ सुखदेव  खाडे यांनी दिली.

गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई खाडे या आपल्या घराच्या शेजारी बांधलेल्या गोठ्याकडे गेल्यानंतर पत्र्याच्या अँगलला कांतीलाल खाडे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खाडे यांना इंदापूर येथील सरकारी दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.खाडे यांच्याकडे तीन एकर जमीन असून त्यांच्यावर सुमारे अठरा ते एकोणवीस लाखांचे कर्ज असल्याचे ग्रामस्थांकडून समजते. याप्रकरणी इंदापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव करत आहेत.आत्तापर्यंत या भागात चार शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकरी कर्जमुक्त करण्याच्या वल्गना केल्या मात्र शेतकरी कर्जमुक्त  झाला नसल्याने आत्महत्या करण्याचे पाऊल शेतकरी उचलून आपले जीवन संपवत आहे तरी देखील मायबाप सरकारला जाग येत नाही असा त्रागा अंत्यविधी करण्यासाठी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

टॅग्स :IndapurइंदापूरDeathमृत्यूFarmerशेतकरी