कृषी पंपाचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:05 PM2021-07-18T23:05:08+5:302021-07-18T23:05:41+5:30

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मिरजे हे मिरजे शिवार येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातून शेती पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

Farmer dies due to shock of agricultural pump; Incidents in Khed taluka | कृषी पंपाचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

कृषी पंपाचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

Next

राजगुरूनगर:  कडधे ( ता. खेड ) येथे वीजेचा शॉक लागून ५२  वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर विठ्ठल मिरजे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
 
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मिरजे हे मिरजे शिवार येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातून शेती पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मोटारपंप चालु करत असताना वीजेचा जबर शॉक बसला. मात्र, आजुबाजुला कोणी नसल्यामुळे जमीनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान एक महिला शेतात आल्यावर हा प्रकार दिसताच गावात जाऊन खबर दिली.

ग्रामस्थांनी तातडीने भीमा नदीकिनारी जाऊन त्यांना रुणालयात दाखल केले. डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. याबाबत संदिप सुदाम मिरजे रा. कडधे (ता खेड )यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहे..

Web Title: Farmer dies due to shock of agricultural pump; Incidents in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी