शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:26 IST

एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

ठळक मुद्देपेरणे-जगताप वस्ती येथील घटना

वाघोली : महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास पेरणे (ता. हवेली) येथील जगताप वस्ती येथे घडली. एक गाय व पाळीव कुत्र्याचा देखील करंट बसून मृत्यू झाला असून, शेतकऱ्याचा मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले आहेत. एचटी लाईनच्या तुटलेल्या तारेबाबत एमएसईबीला कळवूनसुद्धा काम केले नसल्यामुळे एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. भगवान रामकृष्ण जगताप (रा. जगताप वस्ती) असे करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

तर शेतकऱ्याचा मुलगा ऋत्विक व पत्नी मीनाक्षी थोडक्यात बचावले आहेत. शेजारी असणारे संतोष जगताप, प्रकाश कोंडे यांनी जगताप कुटुंबीयांना वाचविण्याचा प्रयत्न केला. ऋत्विक व मीनाक्षी यांना वाचविण्यात यश आले परंतु भगवान जगताप यांना वाचविता आले नाही. त्यांना उपचारासाठी वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जगताप यांची गाय व पाळीव कुत्र्याचादेखील करंट लागून मृत्यू झाला आहे.......प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप वस्ती येथील एका शेतामध्ये जगताप कुटुंबीय गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चरत असताना एका गाईला करंट लागून ती पडल्याचे ऋत्विक जगताप याला दिसले. त्याने गाईला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता त्यालासुद्धा करंट बसला. च्तेथेच जवळ असणारे भगवान जगताप यांनी ऋत्विकला जोराचा धक्का दिला. धक्का दिल्यानंतर ऋत्विक बाजूला पडला परंतु भगवान जगताप यांना जोरदार करंट बसला. यामध्ये मीनाक्षी जगताप यांनासुद्धा करंट बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणDeathमृत्यूFarmerशेतकरी