शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाने लाडक्या ‘सर्जा राजा’साठी साकारला ५० बाय २० फुटी आकर्षक ‘किल्ला प्रतिकृती मांडव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:13 IST

आपल्या मुक्या प्राण्यांना बळीराजा किती जीव लावतो हे त्याचे उत्तम उदाहरण

ठळक मुद्देउन्हापासून आपल्या जनावरांचे संरक्षण व्हावे हा त्यामागचा उद्देश

मंचर: सातगाव पठार भागातील पेठ, पारगाव, भावडी, कारेगाव, कुरवंडी, थुगाव, कोल्हारवाडी या गावांत उन्हाळ्यामध्ये आपल्या पशुधनासाठी शेतांमध्ये आजही कडब्याच्या पेंढ्यापासून मांडव तयार केला जातो. उन्हापासून आपल्या जनावरांचे संरक्षण व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो.आपल्या मुक्या प्राण्यांना बळीराजा किती जीव लावतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याच पार्श्वभूमीवर सातगाव पठार भागातील पेठ येथील एका शेतकऱ्याने साधारण अडीच महिन्यांचा कालावधी खर्च करत ५० बाय २० फुटी मांडव हा ज्वारीचा कडबा व बांबुपासून तयार केला आहे. पण या मांडवाचे वैशिष्टये म्हणजे त्याची रचना हुबेहुब एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे. तसेच सोबतीला यावर्षी रायगडाची मेघडंबरी हा देखावा साकारला आहे. हा मांडव 'आकर्षणाचा केंद्रबिंदू' ठरत असून सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.सातगाव पठार भागातील पेठ येथील शेतकरी दिलीप म्हातारबा पवळे यांनी आपल्या शेतात बैलांसाठी मांडव तयार करून त्याला किल्ल्याचे स्वरूप दिले आहे. त्यांच्याकडे शर्यतीसाठी धावणारी बैल त्यांच्याकडे असून जरी शर्यतींना बंदी असली तरी हे बैलांना प्रंचड जीव लावत त्यांचा सांभाळ करतात. लॉकडाऊनमुळे संचारबंदी सुरू असली तरी शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे  शेतात कामासाठी निघालेले परिसरातील शेतकरी आवर्जून हा मांडव पाहून पुढे मार्गस्थ होतात. येथे भेट देणाऱ्या अनेकांना हा मांडव नसून एक किल्लाच आहे असा भास होतो. ज्वारी कडब्याच्या पेंढ्यांपासून तयार करण्यात आलेल्या या मांडवाला पाहण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असतात. आपल्या मांडवरुपी किल्ल्याच्या दर्शनी भागात भाले, ढाली,तलवारी आदी वस्तू लावलेले आहेत. बैलगाडा शर्यत सुरू असताना आपल्या लाडक्या 'सर्जा राजां'ना बक्षिस म्हणून मिळालेली प्रशस्तीपत्रक देखील मांडवाच्या दर्शनी भागात लावलेली आहेत. रायगडाची मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भगवा ध्वजासहित दिसत आहे .हा मांडव बांधण्यासाठी त्यांना मुलगा शिवाजी, मुलगी पौर्णिमा, मित्रमंडळी आणि वस्तीवरील सहकारी यांची मोलाची साथ लाभली आहे.

दिलीप पवळे म्हणाले, बैलाला शेतकरी घरातील सदस्य मानतो. त्याला कुटुंबातील सदस्यप्रमाणे सांभाळले जाते दरवर्षी वेगळ्या प्रकारचा मांडव बनवला जातो. लॉकडाऊनमुळे बाहेर कुठे जाता येत नाही .त्यामुळे एक आगळावेगळा मांडव बनवण्याचा प्रयत्न केला आहे.बैलगाडा शर्यत बंदीमुळे बैल शर्यतीत पळत नसले तरी त्यांचा सांभाळ ह्यापुढेही  चांगल्या पद्धतीने करणार आहे.

 

 

टॅग्स :MancharमंचरFarmerशेतकरीFortगडBull Cart Raceबैलगाडी शर्यत