शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा न्यायालयात पक्षकारांचे कुटुंबीयच करताहेत गर्दी : सोशल डिस्टन्सिंंगचे होतेय उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 15:51 IST

जामिनावर सुटका व्हावी यासाठी न्यायालयात गर्दी करणाऱ्या आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांमुळे सोशल डिस्टन्सिंंगचा भंग

ठळक मुद्दे केवळ महत्वाच्या दाव्यावर होतेय सुनावणी  अनेक पक्षकार पोलिसांशी वाद घालत असल्याची तक्रार

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा न्यायालयातील कामकाजात बदल करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारे कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी न्यायालय प्रशासनने घेतली आहे. मर्यादित न्यायाधीश, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांच्यासह केवळ अतिमहत्त्वाच्या दाव्यांची दखल घेतली जात आहे. मात्र दुसरीकडे आरोपीचे कुटुंबातील सदस्य कोर्टाच्या आवारात गर्दी करून सोशल डिस्टन्सिंंग उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून दुर राहण्यासाठी एकीकडे आरोग्य विभाग, प्रशासकीय विभाग सातत्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे दररोज हजारो पक्षकारांची ये-जा असणाऱ्या जिल्हा न्यायालयातील गर्दी मात्र अद्याप कमी झालेली नाही. यामुळे पुणे न्यायालय प्रशासन आणि पुणे बार असोसिएशन यांच्यावतीने पक्षकारांना केवळ महत्वाच्या कामाकरिता न्यायालयात हजर राहावे असे सांगितले आहे.  मागील दोन दिवसांपासून न्यायालयातील वाढत्या गदीर्मुळे पक्षकारांनी शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याच न्यायालयात यावे. असे सांगण्यात येत आहे.   जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून महत्वाचे काम असल्यासच न्यायालयात यावे असे सांगण्यात आले आहे. मात्र याकडे पक्षकारांचे कुटुंबीय दुर्लक्ष करताना दिसून आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गर्दी करु नका. महत्वाचे काम असेल तरच या असे सांगून देखील अनेक पक्षकार पोलिसांशी वाद घालत असल्याची तक्रार काही वकिलांनी केली आहे. सर्व शहर सुरक्षेच्या कारणास्तव बंद असताना नागरिकांची अरेरावी चुकीची आहे. अशी तक्रार पोलिसच नागरिकांबद्द्ल करत होते.  

* स्वत:च्या तसेच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचेन्यायालयात आरोपी आणि त्यांच्या सोबत असणारी मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य यांची संख्या मोठी आहे. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सुरक्षितता बाळण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे अनेकांकडून अद्याप कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. सध्या न्यायालयात केवळ महत्वाच्या खटल्याचे कामकाज सुरू आहे. इतर कुठल्याही स्वरूपाचे खटले दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विशेषत: यात पोस्कोचा उल्लेख करावा लागेल. जामिनावर सुटका व्हावी यासाठी न्यायालयात गर्दी करणाऱ्या  आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांमुळे सोशल डिस्टन्सिंंगचा भंग होत आहे. त्याचे पालन करणे आणि आपल्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. अ‍ॅड. लीना पाठक (जिल्हा सरकारी वकील)कुटुंबीयच 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटकadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस