शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

‘त्यां’नी बोेगद्यातच थाटलाय संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:45 IST

स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कामगार पावसाशी व कडाक्याच्या थंडीशी दोन हात करीत हिमतीने प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत.  मुंबई-पुणे अप रेल्वेमार्ग दुरुस्ती

ठळक मुद्देमुंबई-पुणे अप रेल्वेमार्ग दुरुस्ती ; दिवसरात्र युद्धपातळीवर काम सुरू रोजच मैलोन् मैल चालावे लागते

तेजस टवलारकर -  पुणे : मुंबई-पुणे यांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणजे रेल्वे; परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या रेल्वेमार्गावर सातत्याने दरडी कोसळणे, रेल्वे मार्गावर पाणी साचणे अशा प्रकारचे अडथळे निर्माण झाले. त्यामुळे अनेकदा गाड्या रद्द करण्याची वेळ  रेल्वे प्रशासनावर आली. रोज नव्याने उभ्या राहणाऱ्या या संकटांवर मात करीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दिवसरात्र युद्धपातळीवर काम सुरू आहे; पण या पुनर्निर्मितीच्या कामात तिथे राबणाऱ्या कामगारांची अवस्था फारच हलाखीची आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कामगार पावसाशी व कडाक्याच्या थंडीशी दोन हात करीत हिमतीने प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत. मुंबई-पुणे अप रेल्वेमार्ग दुरुस्तीच्या कामासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील कामगार आहेत. तसेच, कोकणातील कामगारसुद्धा येथे काम करीत आहेत. या कामगारांनी मंकी हिलच्या बोगद्यातच आपला संसार थाटला आहे. तेथेच जेवण, झोपण्यासह ही सर्व कामगारमंडळी जीव धोक्यात घालून  वास्तव्याला आहे. अडीच किलोमीटरच्या अंतरातील बोगद्यातच जवळपास ४० कामगार राहतात. या कामगारांना दिवसाला ३०० रुपये पगार दिला जातो. त्यांना कोणतेही साहित्य लागले, तर थेट लोणावळा गाठावे लागते. मंकी हिल परिसरात ५ नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्या पावसातही कामगार बोगद्यातच राहत होते. दºयाखोºया, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, थंडी अंगावर घेत हे कामगार काम करीत आहेत. तिथे चालण्याकरिता जागा नाही, खाली पायाला रुतणारे दगड, कधीही कोसळणाºया दरडी अशा हलाखीच्या परिस्थितीत ही मंडळी पोटापाण्यासाठी जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत आहेत.दगडावर कामगार झोपत आहेत. रोजच काहीना काही अपघात हा होतोच, असे काही कामगारांचे सांगितले. रेल्वे प्रशासनाकडून प्रथमोपचारांसह डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.............रोजच मैलोन् मैल चालावे लागतेज्या भागात काम सुरू आहे. त्या ठिकाणी मालगाडी जाणे शक्य नसल्यामुळे दूर अंतरावर मालगाडी  उभी करावी लागते. तेथून सर्व साहित्य घेऊन पायी जावे लागते. .........दरड कोसळणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी काही कामगार डोंगरावर जाऊन पाहणी करीत असतात. .........हवामानापुढे हतबलता मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आता हिवाळा सुरू झाला आहे; त्यामुळे रोजच थंडी आणि धुक्यांचा सामना कामगारांना करावा लागत आहेत. हवामानामुळे बºयाच वेळा अडचणी येत आहेत. त्यामुळे काम करण्याला मर्यादा येत आहेत. .........

टॅग्स :lonavalaलोणावळाrailwayरेल्वे