वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबांना मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:53+5:302021-05-05T04:16:53+5:30

-- नसरापूर : चेलाडी-नसरापूर (ता. भोर) येथे रविवारी (२ मे) दुपारी वीज पडून दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये आदिवासी ...

The families of the girls killed in the power outage will get Rs 4 lakh each | वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबांना मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत

वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबांना मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत

--

नसरापूर : चेलाडी-नसरापूर (ता. भोर) येथे रविवारी (२ मे) दुपारी वीज पडून दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन मुली मरण पावल्या. त्यांना शासनाच्यावतीने प्रत्येकी चार लाखांची मदत करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी नसरापूर येथे घटनास्थळी आपत्तीग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन माहिती दिली.

रविवारी (दि.२) झालेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेत सीमा अरुण हिलम (वय ११), अनिता सिंकदर मोरे (वय ९, दोघी रा. नसरापूर) या शाळकरी मुलींच्या अंगावर वीज कोसळली व त्या जागीच ठार झाल्या होत्या. तर चांदणी प्रकाश जाधव (वय ९) ही गंभीर जखमी झाली होती.

भोर तहसीलदार अजित पाटील यांनी मृत कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्ती सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे, सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहूनाना शेलार, गटविकास अधिकारी विशाल तनपूरे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, पोलीस हवालदार प्रमोद भोसले, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, ग्रामसदस्य संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झोरे, अनिल शेटे, ऋषिकेश खेडकर उपस्थित होते.

येथील झालेल्या दुर्घटना ठिकाणी तहसीलदार अजित पाटील यांनी घटनास्थळाची जागेवर जाऊन पाहणी केली. या वेळी दगडू हिलम यांनी या दुर्घटना जागेवर अनेक दुर्घटना घडल्या असून येथून नसरापूर येथील जुन्या जागेत स्थलांतर करावे, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली. त्याबाबतही तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी या समाजातील ३० कुटुंबांना घरकुल योजना आणि शबरी योजनेतून पक्के घरे मिळवून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव करणार असल्याची माहिती सांगितली.

या वेळी भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव व उपसभापती लहूनाना शेलार यांनी दुर्घटनाग्रस्त मृत मुलींच्या कुटुंबांना पंचायत समितीच्या वतीने वस्तू स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांची मदत देणार असल्याचे सांगितले.

--

फोटो क्रमांक: ०३ भोर नसरापूर मदत

फोटो व ओळ : रविवार (दि.२) रोजी चेलाडी-नसरापूर येथे भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले.

Web Title: The families of the girls killed in the power outage will get Rs 4 lakh each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.