शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

‘शिवाजीराव भोसले बँके’कडून खोटा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:46 PM

आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत..

ठळक मुद्देरिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या पाहणीत उघड : ५६ टक्के एनपीए दाखविला १५.७२ टक्केअहवालात चांगली खाती, बुडीत खाती, नेट एनपीए या सर्वांचीच चुकीची आकडेवारी दिल्याचे समोर

पुणे : आर्थिक अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या शिवाजीराव सहकारी बँकेने आपली आर्थिक स्थिती चांगली दाखविण्यासाठी चक्क खोटा अहवाल तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केलेल्या पाहणीत बँकेने अनुत्पादक खात्यांचे (एनपीए) प्रमाण ५६.२४ टक्के प्रचंड असताना ते अवघे १५.७२ टक्के असल्याचे दाखविण्यात आले होते. बँकेच्या नफ्याबाबतची आकडेवारी देखील चुकीचे दिल्याचे आरबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक ठेवीदार-खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. बँकेने मार्च २०१७ अखेरीस केलेल्या अहवालात चांगली खाती, बुडीत खाती, नेट एनपीए या सर्वांचीच चुकीची आकडेवारी दिली असल्याचे समोर आले आहे. तसेच, २०१६-१७ या वर्षांत बँक तोट्यात असताना १११ कोटी ६६ लाख रुपयांचा नफा दाखविला आहे. तर, २०१७-१८ या वर्षात तोटा तिप्पटीने कमी दाखविण्यात आला. आरबीआयने केलेल्या पाहणी शिवाजीराव भोसले बँकेचा लबाडपणा उघड झाला आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रातून हे समोर आले आहे. या बाबत माहिती देताना वेलणकर म्हणाले, आरबीआय जनतेच्या पैशातूनच बँकांचा पाहणी अहवाल करीत असते. त्यामुळे सर्व बँकांचे तपासणी अहवाल आरबीआयने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले पाहीजे. त्यामुळे खरा अहवाल खातेदरासमोर येईल. त्यावरुन आपले पैसे संबंधित बँकेत ठेवायचे की नाही, याचा निर्णय त्यांना घेता येईल. आरबीआयने याचा विचार न करताच तपासणी अहवालाची कागदपत्रे देण्याचे नाकारले होते. त्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. .........बँकेने २०१७-१८ साली दिलेल्या अहवालात आर्थिक स्थिती चांगली दाखविण्यासाठी नफा, तोटा, बुडीत कर्जाबाबत चुकीची माहिती दिली. आरबीआयने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर मार्च २०१८मध्ये मात्र, आकडेवारी बरोबर आल्याचे वेलणकर म्हणाले. ........नक्त नफा तक्ता (रक्कम लाखांत)परिमाणे    २०१६-१७    २०१७-१८बँकेने दाखविलेला नक्त नफा    १११.६६    -१८६१.४२आरबीआय तपासणीतील नफा    -२९४०.७९    -६८६९.०१............बँकेचा मार्च २०१७ ताळेबंद  (रक्कम लाखांत)परिमाणे    बँकेने केलेल्या    आरबीआयच्या     अहवालातील आकडे    अहवालातील आकडेस्टँडर्ड असेट    ३१५३८.४५    १६३७६.४०सब स्टँडर्ड असेट    ४१०२.८८    १७९२७.२०डाऊटफूल असेट    ३७७२.०२    ५१०९.७५    लॉस असेट    २४०.१५    २४०.१५ग्रॉस एनपीए    ८११५.०५ (२०.४६ टक्के)    २३२७७.१० (५८.७० टक्के)नेट एनपीए    ५८८२.३० (१५.७२ टक्के)    २१०४४.३५ (५६.२४ टक्के)...........

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक