False report given from 'Shivajirao Bhosale Bank' | ‘शिवाजीराव भोसले बँके’कडून खोटा अहवाल

‘शिवाजीराव भोसले बँके’कडून खोटा अहवाल

ठळक मुद्देरिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या पाहणीत उघड : ५६ टक्के एनपीए दाखविला १५.७२ टक्केअहवालात चांगली खाती, बुडीत खाती, नेट एनपीए या सर्वांचीच चुकीची आकडेवारी दिल्याचे समोर

पुणे : आर्थिक अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या शिवाजीराव सहकारी बँकेने आपली आर्थिक स्थिती चांगली दाखविण्यासाठी चक्क खोटा अहवाल तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केलेल्या पाहणीत बँकेने अनुत्पादक खात्यांचे (एनपीए) प्रमाण ५६.२४ टक्के प्रचंड असताना ते अवघे १५.७२ टक्के असल्याचे दाखविण्यात आले होते. बँकेच्या नफ्याबाबतची आकडेवारी देखील चुकीचे दिल्याचे आरबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. 
आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक ठेवीदार-खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. बँकेने मार्च २०१७ अखेरीस केलेल्या अहवालात चांगली खाती, बुडीत खाती, नेट एनपीए या सर्वांचीच चुकीची आकडेवारी दिली असल्याचे समोर आले आहे. तसेच, २०१६-१७ या वर्षांत बँक तोट्यात असताना १११ कोटी ६६ लाख रुपयांचा नफा दाखविला आहे. तर, २०१७-१८ या वर्षात तोटा तिप्पटीने कमी दाखविण्यात आला. 
आरबीआयने केलेल्या पाहणी शिवाजीराव भोसले बँकेचा लबाडपणा उघड झाला आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रातून हे समोर आले आहे. 
या बाबत माहिती देताना वेलणकर म्हणाले, आरबीआय जनतेच्या पैशातूनच बँकांचा पाहणी अहवाल करीत असते. त्यामुळे सर्व बँकांचे तपासणी अहवाल आरबीआयने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले पाहीजे. त्यामुळे खरा अहवाल खातेदरासमोर येईल. त्यावरुन आपले पैसे संबंधित बँकेत ठेवायचे की नाही, याचा निर्णय त्यांना घेता येईल. आरबीआयने याचा विचार न 
करताच तपासणी अहवालाची कागदपत्रे देण्याचे नाकारले होते. त्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. 
.........
बँकेने २०१७-१८ साली दिलेल्या अहवालात आर्थिक स्थिती चांगली दाखविण्यासाठी नफा, तोटा, बुडीत कर्जाबाबत चुकीची माहिती दिली. आरबीआयने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर मार्च २०१८मध्ये मात्र, आकडेवारी बरोबर आल्याचे वेलणकर म्हणाले. 
........
नक्त नफा तक्ता (रक्कम लाखांत)
परिमाणे    २०१६-१७    २०१७-१८
बँकेने दाखविलेला नक्त नफा    १११.६६    -१८६१.४२
आरबीआय तपासणीतील नफा    -२९४०.७९    -६८६९.०१
............
बँकेचा मार्च २०१७ ताळेबंद  (रक्कम लाखांत)
परिमाणे    बँकेने केलेल्या    आरबीआयच्या 
    अहवालातील आकडे    अहवालातील आकडे
स्टँडर्ड असेट    ३१५३८.४५    १६३७६.४०
सब स्टँडर्ड असेट    ४१०२.८८    १७९२७.२०
डाऊटफूल असेट    ३७७२.०२    ५१०९.७५    
लॉस असेट    २४०.१५    २४०.१५
ग्रॉस एनपीए    ८११५.०५ (२०.४६ टक्के)    २३२७७.१० (५८.७० टक्के)
नेट एनपीए    ५८८२.३० (१५.७२ टक्के)    २१०४४.३५ (५६.२४ टक्के)
...........

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: False report given from 'Shivajirao Bhosale Bank'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.