शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

'इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणाचा खोटा पुरस्कार', झळकलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 4:08 PM

स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला या आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्‍याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे.

बाभुळगाव : इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत देशपातळीवर सलग चौथ्यांदा जाहिर झालेला पुरस्कार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेचे अभिनंदन करणारे बॅनर इंदापूर शहरात चौकाचौकात झळकले. परंतु अज्ञात व्यक्तिने त्या बॅनर शेजारी, सध्याची परास्थिती पाहता इंदापूर शहराला स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला. अशा आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्‍याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही  बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे.

नगरपरिषदेला मिळालेला पुरस्कार हा इंदापूर तालुका व शहराच्या दृष्टिने अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी गटनेता, विरोधी पक्षनेता, विरोधीपक्ष गटनेता, आरोग्य सभापती, आरोग्य अधिकारी किंवा विरोधी नगरसेवक यांना मान देऊन अभिमानाने पुरस्कार स्वीकारणे गरजेचे होते. परंतु मुख्याधिकारी यांना मनमानी कारभार नडला व याबाबत सत्ताधारी व विरोधकांना कानाची खबर न देता एका नगरसेवकासोबत दिल्लीत जाऊन तो पुरस्कार गुपचुपपणे स्विकारण्याचे कारण काय? याबाबची चर्चा इंदापूर शहरात दबक्या आवाजात सुरू झाली.

एकूणच इंदापूर शहरात लागलेल्या शुभेच्छा बॅनर शेजारी नगरपरिषदेचे कामकाज व विकासाचे वाभाडे काढणारे व पुरस्कार खोटा मिळाल्याचे बॅनर लावले आहे. हे बॅनर कोणी लावले? याचा शोध भविष्यात नगरपरिषद घेणार का? ही घटना घडून चार दिवस उलटले तरी नगरपरिषद सत्ताधार्‍यांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे. परंतु खर्‍या अर्थाने शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत शहराची पाहणी केल्यास शहराच्या आनेक भागात अस्वच्छता व कचर्‍यांचे मोठे ढीग आजही आपल्या निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेला देशपातळीवरचा चौथा पुरस्कार मिळालाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :IndapurइंदापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNarendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे