शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पुणे येथे बनावट आरटीई प्रवेश मिळवून देणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 20:37 IST

आरोपी बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारत आणि ती आरटीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सादर करत असत.

ठळक मुद्देबनावट आधार कार्ड, दोन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, बनावट शिक्के असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

हडपसर:  आधार कार्डावरील पत्ता बदलून, बोगस आधारकार्ड तयार करुन त्याबरोबरच अन्य कागदपत्रे बनावट बनवून त्याद्वारे आर्थिक दुर्बल गटातील  मुलांसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचा फायदा धनदांडग्यांना मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश हडपसर पोलिसांनी केला आहे. बनावट कागद तयार केले असले तरी ऑनलाईन प्रक्रियेतून प्रवेश मिळवून देणाऱ्या  सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोलीस पोहचतात का नाही? याकडे सर्वसामान्य पालकांचे लक्ष राहणार आहे.या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ५ जणांना अटक केली. दीपक विठ्ठल गरुड (वय ३६, रा. महादेवनगर, हडपसर), सचिन रतन बहिरट (वय ३६, रा. माळवाडी, हडपसर), सुधीर अभिमन्यू काकडे (वय ३५, रा. माळवाडी, हडपसर), ऋषिकेश भानुदास ढमाले  (वय २८, रा. टाकवे खुर्द ता. मावळ) आणि अनिकेत सुरेश शिंदे (वय ३२, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, दोन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कलर प्रिंटर, बनावट शिक्के तसेच अन्य बनावट कागदपत्रे असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ..................

ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आतील आहे, अश्या पालकांच्या विध्यार्थ्यांना आरटीइ २५ टक्के अंतर्गत प्रवेश दिला जातो. शासनाच्या आरटीइ योजनेअंतर्गत नर्सरी ते १ ली या वगार्तील प्रवेश करून देण्यासाठी पालकांचे बनावट पत्ते असलेले आधारकार्ड, बनावट उत्पनाचे दाखले बनवून शिक्के मारूनत्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५० हजार ते दीड  लाख रुपये घेत.  आरोपी बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारत आणि ती आरटीईच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सादर करीत असत. नामांकित शाळेमध्ये एका वषार्ची फी लाखो रुपये आहे. त्यामुळे ८ वि पर्यंतचे शिक्षण हे एकदा प्रवेश घेतला कि मोफत होते. तर दुसरीकडे या योजनेअंर्तगत गरीब विध्यार्थ्यांना मिळणाºया त्यांचा लाभ व हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या आरोपीने  २०१८ व २०१९ या दोन वर्षांत सुमारे ८५ विध्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत.हडपसर येथील मेघराज लॉजवर ही टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तेथे छापा घालून त्यांना पकडले. अश्या प्रकारचे अजून एजंट असल्याची पोलिसांना दाट शक्यता आहे. या आरोपींची २५ प्रकारचे शिक्के सापडले आहेत. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, स.पोनि. संजय चव्हाण, पो.हवा. रमेश साबळे, पो.हवा. राजेश नवले, पो.हवा. औचारे, पो.हवा. युसूफ पाठव, पो.ना. शद्ब भोजराव,पो.ना. विनोद शिवले, पो.शी. अकबर शेख , पो.ना. प्रताप गायकवाड, पो.ना. अनिल कुसाळकर, पो.शी. शाहिद शेख ,पो.शी. अमित कांबळे,पो.ना. गणेश दळवी, पो.शी. ज्ञानेश्वर चित्ते, पोशी गोविंद चितळे  यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा