शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानदाराला खंडणी मागणाऱ्या तोतया ग्राहक मंच अधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 23:19 IST

पाषाण येथील विजया लक्ष्मी सुपर मार्केट या दुकानातूनही अशाच प्रकारे २० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न

ठळक मुद्देचतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावात अनेक दुकानदार विक्री करतात. पोलिसांनी अशा दुकानदारांवर कारवाई केली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन भारत सरकारच्या ग्राहक मंचचा अधिकारी असल्याचा बनाव करुन दुकानदारांकडून खंडणी उकळणाऱ्या तोतयास खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत अगोदर तक्रार आल्यावर त्यांनी पडताळणी केली. त्यात तो सरकारी अधिकारी नसल्याने त्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती.निशिकांत रामचंद्र धुमाळ (वय ४५, रा. ग्रीन व्हिला सोसायटी, सूस रोड, पाषाण) असे त्याचे नाव आहे. त्याने त्यांच्या चारचाकी गाडीला भारत सरकार असा बोर्ड लावून मी ग्राहक मंचाचा अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याने पाषाण येथील विजया लक्ष्मी सुपर मार्केट या दुकानातूनही अशाच प्रकारे धमकावुन २० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.निशिकांत धुमाळ हा पाषाण येथील धनश्री सुपर मार्केट या दुकानात गेला होता. दुकानाचे मालक मांगीलाल तानाजी चौधरी यांना मी ग्राहक मंचाचा अधिकारी असे सांगून तुम्ही चढ्या दराने मालाची विक्री करता व तुम्ही बील देत नाही. तुमचे दुकान सील करु़. तुम्हाला दंड भरावा लागेल, अशी धमकी दिली. कारवाई न करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची मागणी केली. त्यावर चौधरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यांनी या तक्रारीच पडताळणी केली. तेव्हा त्यात धुमाळ याने तडजोड करुन ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पडताळणी करीत असताना धुमाळ हा लोकसेवक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे शहर पोलिसांकडे पाठविली. गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक महाडिक, हवालदार मगर, गुरव, पोलीस नाईक मंगेश पवार यांनी निशिकांत धुमाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ग्राहक मंच भारत सरकार असा बोर्ड व ओळखपत्र, चारचाकी गाडी जप्त केले आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग