शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

जुन्नरमध्ये उत्पन्नाचा बनावट दाखला देणारे रॅकेट उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:19 IST

जुन्नर पोलिसांनी या संदर्भात विनोद चंद्रकांत बिडवई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जुन्नर : ५०० रुपयात अवघ्या पंधरा मिनिटात तहसीलदारांच्या डिजिटल सहीचा बनावट उत्पन्नाचा दाखला देणारे रॅकेट जुन्नर तालुका पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. जुन्नर पोलिसांनी या संदर्भात विनोद चंद्रकांत बिडवई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तालुका पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी या संदर्भात जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पुरवठा विभागाच्या कार्यालयामधील कर्मचारी दीपाली कोकणे यांच्याकडे ताराबाई शिंदे या शिधापत्रिका काढण्यासाठी आल्या होत्या. कोकणे यांनी शिंदे यांच्याकडील कागदपत्राची छाननी केली असता त्यामध्ये त्यांचे उत्पन्न अक्षरी ४५००० नमूद केले होते. त्यामुळे कोकणे यांनी सदर महिलेला कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन या असे सांगितले. त्यानंतर शिंदे या ४२००० रुपये उत्पन्न असल्याचा दाखला घेऊन आल्या. परंतु सदर उत्पन्नाच्या दाखल्यावर मागील तहसीलदार रवींद्र सबनीस यांची डिजिटल सही दिसल्याने कोकणे यांनी उत्पन्नाचा दाखला महसूल विभागाच्या ऑनलाइन वेबसाईटवर तपासला. त्यावेळी सदर उत्पन्न दाखल्याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. म्हणून कोकणे यांनी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांना सदरची माहिती दिल्याने त्यांनी उत्पन्न धारकाचा मुलगा दत्तात्रय शिंदे यास दाखला कोठे बनवला आहे. याची विचारणा केली.त्यावर दत्तात्रय याने सदरचा दाखला जुन्नरमधील शंकरपुरा पेठ चौकातील रामकृष्ण हरी लॉटरी सेंटरमध्ये दाखला बनवला असल्याचे सांगितले. या संदर्भात पुरवठा निरीक्षक कुलकर्णी यांनी शिंदे यांचा लेखी जबाब घेतला. तसेच कार्यालयीन कर्मचारी अभिजित पिंगळे यास तुझ्या नावाचा उत्पन्नाचा दाखला घेऊन ये असे सांगितले. त्यानंतर पिंगळे यांनी पंधरा मिनिटातच त्याच्या नावाचा ४३ हजार रुपयांचा उत्पन्नाचा दाखला घेऊन आला. त्यावरून सदर दाखले हे बनावट असल्याची फिर्याद कुलकर्णी यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली. तेथील सहायक पोलिस निरीक्षक एस. के. मोरे यांनी पुन्हा एक बोगस ग्राहक पाठवून त्यांच्याकडे पाचशे रुपये देऊन सदर ठिकाणी जाऊन उत्पन्नाचा दाखला आणण्यासाठी पाठविले.

त्याला देखील २० मिनिटात उत्पन्नाचा दाखला मिळाला. पोलिस पथकाने राम कृष्ण हरी लॉटरी सेंटरमध्ये जाऊन तेथे असलेल्या विनोद बिडवई याला उत्पन्नाचे दाखले तयार करण्याचा परवाना असल्याची विचारणा केली. तसेच पंचासमक्ष दुकानाची झडती घेतली असता त्याच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये पोलिसांनी दिलेली पाचशे रुपयांची नोट तसेच इतरांचे उत्पन्नाचे दाखले आढळले. पोलिसांनी उत्पन्नाचे बनावट दाखले तयार करण्यासाठी लागणारे सीपीयू, मॉनिटर, कलर प्रिंटर आदी साहित्य जप्त केले. पोलिस निरीक्षक किरण अवचर, सहायक पोलिस निरीक्षक एस. के. मोरे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक