शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बनावट आयडीतून ई-तिकीट घोटाळा, ६२ हजार रुपयांची तिकिटे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 02:18 IST

आरपीएफकडून दोन जणांना अटक : ६२ हजार रुपयांची तिकिटे जप्त

पुणे : बनावट ई-मेल आयडीच्या आधारे रेल्वेच्या संगणक प्रणाली (ई-तिकिट) द्वारे रेल्वेच्या विविध ठिकाणी धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षित तिकीट काढून घोटाळा करणाºया सांगली येथील दोघांना रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने अटक केली आहे.

मनजित बाबासाहेब पाटील (वय ३७, रा. सांगली), गजानन काडप्पा गोंधळी (वय २९, रा. सांगली) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहते. हे दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाड्यांचे ई-तिकीट काढत होते. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दोघेही संबंधित कॅफेमध्ये आले व तिकिटांचे प्रिंट घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पुढील तारखेची दहा तिकिटे व मागील ५० असे एकूण ६२ हजार रुपयांची ६० तिकिटे जप्त केले आहेत. तसेच दोन संगणक, दोन मॉनिटर, दोन मोबाइल त्यांच्या ताब्यातून हस्तगत केले आहे. बनावट आयडीद्वारे ते काही सेकंदाच्या आत रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्यावर काढत असल्याचे दिसून आले आहे. रजिस्टर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून आरोपींनी कशाप्रकारे बनावट आयडीद्वारे तिकिटे काढली व त्यांचे आणखी अन्य साथीदार आहेत का याबाबत तपास सुरू आहे.आणखी बनावट ई-मेल आयडी सापडण्याची शक्यताआरोपींकडे अजून काही बनावट ई-मेल आयडी मिळून येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यादृष्टीने तपास आरोपींकडे करावयाचा आहे. सोमवारी त्यांना रेल्वेच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.त्यावेळी सरकारी वकील वामन कोळी यांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन