शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

पुरंदर तालुक्यात बनावट फेसबुक खात्यांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:29 IST

पुरंदर तालुक्यात सध्या सोशल मीडियावरील बनावट खात्यांचा सुळसुळाट झाला आहे.

सासवड - पुरंदर तालुक्यात सध्या सोशल मीडियावरील बनावट खात्यांचा सुळसुळाट झाला आहे. या बनावट खात्यांच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विमानतळ, गुंजवणी, पाणीप्रश्?न, विकासकामे, कर्जमाफी, महामार्गाचे रखडलेले काम, शासकीय निधी आदी प्रश्नांवर आपापसातील मतभेद व हेवेदावे व्यक्त करण्याइतपत मर्यादित असणारे फेसबुकवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे खात्यांवरून आता एकमेकांवर अश्लील भाषेत व आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत राजकीय चिखलफेक करीत असल्याचे दिसत आहे. यातून राजकीय नेत्यांसाह वैयक्तीक मतभेद उघड होत असून मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे कार्यकर्ते एकमेकांची उणीधुणी जाहीरपणे मांडीत असताना पक्षांचे नेते मात्र काहीच बोलत नसल्याने, अशा प्रकारांतून ‘सायबर क्राईम’सह राजकीय गँगवॉर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला आळा कोण घालणार? फेक अकाउंटवरून काँग्रेस ,राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांवरदेखील आक्षेपार्ह टीका केली जात आहे.सोशल मीडियाच्या वापराने सध्या पुरंदर तालुक्यातील प्रत्येक जण स्वयंभू वार्ताहर झाला आहे. फेसबुकवरील बनावट खात्यावरून सहजपणे अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट केल्या जात आहेत. त्याला कोणताही आडपडदा राहिलेला नाही की कुणी सेन्सॉर नाही सोशल मीडियामुळे कोणीही आपल्या मनातील विचार कोणत्याही परिणामांचा विचार न करता फेसबुकवर पोस्ट करित आहे.बनावट खात्यावरून केले गेलेल्या या पोस्टला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही दिला जातो, हा मिळणारा प्रतिसाद व प्रत्युत्तर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असते. सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व मोठा विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती ही या माध्यमात आहे.सोशल मीडिया हा संवादाचा कमी आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा मार्ग काही समाजकंटकांनी शोधून काढला आहे. त्या माध्यमातून एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत.राजकीय पक्षात काम करताना नेत्यांचे चेहरे जनतेमध्ये कायम चर्चेत असतात, अशा वेळी राजकीय विरोधापोटी त्यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करून त्यांची बदनामी करण्याचा व राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच कार्यकर्ता किंवा नेता हा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर होणारे निराधार आरोप व त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक चारित्र्यहनन या गोष्टींची दखल पोलीस प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.या बनावट खात्यांबाबत उपविभागीय अधिकारी भोर विभाग व पोलीस निरीक्षक सासवड यांच्याकडे वारंवार लेखी निवेदने व तक्रारी दिलेल्या असूनही पोलीस प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असून या बाबतीत सर्व प्रकारची माहिती असूनही जाणून-बुजून पोलीस प्रशासन या गंभीर विषयाकडे कानाडोळा का करत आहे? हा ही प्रश्न सध्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया प्रमुखांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवुन पोलीस प्रशासनाने एक बैठक आयोजित करून या सोशल मीडियाच्या प्रमुखांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणीही तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.तसेच जे बनावट खाती सध्या फेसबुक वर वापरले जात आहे त्यांचा सविस्तर तपास केला जावा व सायबर सेलच्या उच्च अधिकाऱ्यांकडून याबाबत त्वरित व कडक कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.पत्रकारांनादेखील या बनावट खात्यांवरून अश्लील कमेंट, शिव्यांचा भडिमार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. बनावट फेसबुक खाते वापरणारे सराईत बनले आहेत व पोलिसांचा कोणताही धाक त्यांना नाही, असेच एकंदरीत दिसून येत आहे .या बनावट खात्यावर वेळीच कारवाई केली गेली नाही तर भविष्यात सोशल मीडियाच्या शाब्दिक वादांतून पुढे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.राजकीय विरोधापोटी त्यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करून त्यांची बदनामी करण्याचा व राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्नकेला जात आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकPuneपुणे