शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

‘व्हिसल ब्लोअर’ मतेंच्या बदलीचा प्रयत्न निष्फळ : पुणे विद्यापीठ प्रशासनाला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 6:00 AM

‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून कौतुक केलेल्या लिपिकांची प्रशासनाने आचारसंहिता सुरू असताना तडकाफडकी अहमदनगरला बदली केली होती

ठळक मुद्देबदली नियमबाहय : उच्च शिक्षण विभागाचा आदेश

पुणे : निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने विद्यापीठातील गैरप्रकार उजेडात आणल्याप्रकरणी ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून कौतुक केलेल्या लिपिकांची प्रशासनाने आचारसंहिता सुरू असताना तडकाफडकी अहमदनगरला बदली केली होती. मात्र, ही बदली नियमबाहय पध्दतीने झाली असून याप्रकरणी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाला चपकार बसल्याचे मानले जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासनामध्ये कार्यरत लिपिक सुनिल मते यांची अचानक नगरला बदली करण्यात आली. मते यांनी या बदलीवर आक्षेप घेऊन उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांच्याकडे दाद मागितली. उच्च शिक्षण विभागाने मते यांचे म्हणणे ग्राहय धरले आहे. ‘‘सुनिल मते हे शासनमान्य अनुदानित पदावर कार्यरत असताना त्यांची नगर येथील विनाअनुदानित पदावर बदली करण्यात आली. ही कार्यवाही प्रशासकीयदृष्टया नियमबाहय आहे आहे,’’ असे उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना कळवले आहे. विद्यापीठातील गैरप्रकारांविरूध्द सातत्याने आवाज उठणाऱ्या मते यांनी माहिती अधिकाराचा वापर अनेक गैरप्रकार आजवर उजेडात आणले आहेत. प्रशासन विभागाचे उपकुलसचिव प्रदीप कोळी यांची पात्रता पूर्ण नसताना त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे त्यांनी उजेडात आणले. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीश जी. डी. तळवळकर यांची समिती नेमण्यात आली होती. ‘‘मते हे ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून चांगले काम करीत आहेत. जिथे चुकते आहे, ते उजेडात आणणे हे त्यांचे सजग कर्मचारी म्हणून कामच आहे,’’ या शब्दात तडवळकर समितीने त्यांची दखल घेतली होती.पदनाम भरती गैरव्यवहार, एमबीए विभागातील आर्मी ऑफिसरचा कोटा बंद करणे, शासनमान्य अनुदानित पदे रिक्त ठेऊन त्या पदांना समकक्ष पदे गैरपध्दतीने निर्माण करणे, आरोग्य केंद्रातील अनागोंदी अशी अनेक प्रकरणे मते यांनी चव्हाट्यावर आणली आहेत. संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणूनही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  ...................माहिती मागत असल्याने ‘रडार’वरइंग्रजी विभागात नुकत्याच दोघा सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या वशिलेबाजीतून करण्यात आल्याची तक्रार पात्रताधारक उमेदवार किरण मांजरे व राज नेरकर यांनी केली होती. याप्रकरणी सुनिल मते यांनी मुलाखत दिलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची माहिती मागितली होती. या माहिती अर्जामुळे त्यांची बदली केल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली होती.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठTransferबदली