शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ठेवी देण्यास टाळाटाळ केल्याने ‘डीएसकें’ना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीमध्ये मुदत ठेवी स्वरुपात ठेवलेल्या तीन लाखांच्या दोन ठेवी परिपक्व झाल्यानंतरही गुंतवलेली रक्कम, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कंपनीमध्ये मुदत ठेवी स्वरुपात ठेवलेल्या तीन लाखांच्या दोन ठेवी परिपक्व झाल्यानंतरही गुंतवलेली रक्कम, तसेच व्याज देण्यास कसूर केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी अ‍ॅन्ड ब्रदर्स कंपनीला न्यायालयाने दणका दिला. तक्रारदाराला सहा लाखांची रक्कम बारा टक्के व्याजदराने निकालाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत देण्याचा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला.

वरद सुशील पटवर्धन यांनी डी. एस. कुलकर्णी अ‍ॅन्ड ब्रदर्स व दिलीप सखाराम कुलकर्णी यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. त्यांनी डी. एस. कुलकर्णी अ‍ॅन्ड ब्रदर्स कंपनीमध्ये ३० मे व १२ सप्टेंबर २०१४ रोजी तीन लाखांच्या दोन मुदत ठेवी वार्षिक बारा टक्के व्याजदराने तीन वर्षांकरिता गुंतविल्या.

ठेवी परिपक्व झाल्यानंतर तक्रारदारांना गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाचा धनादेश देण्यात आला. मात्र, जाबदारांनी तो लगेच मागून घेतला. त्यानंतर, पटवर्धन यांनी गुंतविलेली रक्कम मागितली असता जाबदार यांनी प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणी, त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराला मुदतीत रक्कम न दिल्यास पुढील कालावधीसाठी सहा लाख रुपयांसाठी वार्षिक पंधरा टक्के व्याज आकारण्यात येईल. तसेच, तक्रारदारांना दहा हजार नुकसानभरपाई, तर तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश आयोगाने दिले.