शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 18:30 IST

तांदुळवाडी, रुई आदी भागातील शेतकऱ्यांनी त्या काळात स्वखुशीने जमीनी दिल्या, म्हणून बारामती एमआयडीसी अस्तित्वात आले

बारामती : काहीजण म्हणतात बारामती एमआयडीसीत कोणामुळे कारखाने आले. आम्ही इतक्या दिवस आपण केलं, अशी भुमिका घेतली. आम्ही बॅकफुटवर राहत आमच्या दैवताने केल्याचे सांगत त्यांना मान दिला. त्यांचा नावलाैकीक वाढण्याची काळजी घेतली. पण आमच्या सुध्दा देशाच्या प्रमुखांशी, उद्योजाकांच्या ओळखी आहेत ना, ठीक आहे सुरवातीचा काळात आपण मुख्यमंत्री होतात म्हणुन बारामतीत काही कारखाने आले. परंतु कारखाने नुसते येऊन उपयोग होत नाही. ते कारखाने चालविण्यासाठी पोषक वातावरण ठेवाव लागत, ते ठेवण्याची काळजी आपण घेतली. चंद्रपुरची एमआयडीसी कारखाने बंद पडुन ओस पडली. महाराष्ट्राच्या कित्येेक एमआयडीसीचे  वाटोळे झाले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावला. बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, बारामतीच्या तांदुळवाडी, रुइ आदी भागातील शेतकऱ्यांनी त्या काळात स्वखुशीने जमीनी दिल्या. त्यामुळे बारामती एमआयडीसी अस्तित्वात आल्याचे पवार म्हणाले.  ते पुढे म्हणाले, १४० कोटी जनतेचा कारभाराची हि निवडणुक आहे. सुज्ञ मतदार याचा बारकाइने विचार करतील. मागे वेगवेगळे पंतप्रधान होऊन गेले. मात्र, जनतेशी संपर्क असणारा, शेतकऱ्यांच्या समस्या समजुन घेणारा, त्यांची कामे मार्गी लावण्याचा पायंडा नरेंद्र मोदींनी पाडला. जो यापुर्वीच्या पंतप्रधानांनी पाडलेला नव्हता. दहा वर्ष पंतप्रधान पदावर असताना देखील एक देखील मोदींवर भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडला नसल्याचे  पवार यांनी नमुद केले.

वालचंदनगरमध्ये त्यावेळी आर्थिक सुबत्ता होती. त्यावेळी आपल्यातील काही जे आता भाषण करतात, ते वालचंदनगरला शिकायला जात असत. याचा अर्थ बारामतीला चांगले शिक्षण नव्हते, जे शिक्षण वालचंदनगरला चांगले होते. आम्ही राजकारणात आल्यानंतर हे चित्र बदलले. वालचंदनगर, फलटणचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यास येऊ लागले. आज बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदीक महाविद्यालय कोणी आणले. त्यामुळे त्या परिसराचा कायापालट झाल्याचे सांगत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. 

तुम्ही तुमच्या घरच्या सुना आहेत. तुम्ही सुन म्हणुन आल्यानंतर घरचे होता. बाहेरची होत नाही. आमच्यात ४० वर्षानंतर देखील सुन बाहेरचीच म्हणुन उल्लेख केला जातो. आता तुम्हाला राग आला पाहिजे. ४० वर्ष तुमच्या घरात कष्ट करुन देखील तुम्ही तिला बाहेरचीच म्हणता, हा कुठला न्याय, तुम्ही महिलांचा अपमान करता, त्यांना मान सन्मान द्यायला शिका, अशी देखील टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

मुलगी सुन झाल्यावर त्या घरची लक्ष्मी होते. मुलगी माहेरी आल्यावर आई तिला चार दिवस भावजयीबरोबर आनंदामध्ये रहा, असे सांगते.पुढे त्यांना पाेषाख करुन त्यांच्या घरी पाठवा, असं सांगते. मात्र, त्याचा वेगळा अर्थ काढु नका शहाण्यांनो. नणंद घरी आल्यावर तिला साडीचोळी करा, जावयाला पोषाख करुन त्यांची पाठवणी करा, मला म्हणायचं होतं, अर्थात बटण दाबुन नव्हे, अशी मिश्कील टीपणी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. त्यावर उपस्थितांमध्ये हशा  पिकला.

....बारामतीच्या बाॅडीवर मराठवाड्याचे इंजिन बसणार

डायनामिक्स डेअरी आणण्यासाठी तत्कालीन प्रमुख कै.गाेयंका यांना आपणच जमीन दाखविली. त्यानंतर विविध कारखाने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कारखाने चालु शकले नाहीत. त्यावेळी विलासराव देशमुख उद्योगमंत्री होते. तर ‘साहेब’ मुख्यमंत्री होते. बारामतीच्या रेल्वे स्टेशनच्या मैदानात सभा झाली. क्राॅम्पटन ग्रीव्हजच्या गाडीबाबत त्यावेळी देशमुख  म्हणाले, बारामतीच्या  बाॅडीवर मराठवाड्याचे इंजिन बसणार, ती गाडी सुसाट धावणार, असे वक्तव्य देशमुख यांनी केल्याची आठवण अजित पवार यांनी सांगितली.

टॅग्स :Puneपुणेbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवार