शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूकवरून झालेली फ्रेंडशिप विवाहितेला पडली महागात, 25 वर्षीय तरुणाचा वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 08:59 IST

शारीरिक संबंधांचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार या महिलेवर लैंगिक अत्याचार केला

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : फेसबुक या सोशल मीडियावरून एका तरुणाशी झालेली ओळख एका विवाहित महिलेला चांगलीच महागात पडली. या ओळखीतून तरुणाने विवाहितेला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकाराचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. 

अतुल अशोक इंदलकर (वय 25, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी यांची जानेवारी 2022 मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीतून दोघांची मैत्री झाली.  त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला भेटण्यासाठी बोलावले आणि हांडेवाडी परिसरातील एका लॉजवर घेऊन जात त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान आरोपीने फिर्यादी यांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो देखील काढून घेतले होते. 

त्यानंतर हेच फोटो फिर्यादी यांच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देऊन वारंवार भेटण्यासाठी बोलावले आणि हांडेवाडी येथील लॉजवर आणि फिर्यादी यांच्या घरी त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ देखील केल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाFacebookफेसबुक