प्रियकराकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 14, 2024 16:29 IST2024-04-14T16:29:09+5:302024-04-14T16:29:31+5:30
आरोपीने महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांचा फायदा घेऊन व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले

प्रियकराकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी
पुणे: अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. १३) विशाल केरबा मोतीरावे (रा. उदगीर, लातूर) याच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वडगाव परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते १३ एप्रिल २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. आरोपी विशाल याने फिर्यादी महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांचा फायदा घेऊन व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले. त्याचे स्क्रिनशॉट काढून फिर्यादी महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून त्यावर ते पोस्ट केले. त्यानंतर अश्लील अवस्थेतील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल न करण्यासाठी ५० हजार रुपये पाठवायला सांगितले. फिर्यादीने भीतीपोटी ४ हजार रुपये पाठवले. मात्र आणखी पैसे पाठवण्यासाठी तगादा लावल्याने महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सिंहग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक क्षीरसागर करत आहेत.