शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

MHADA: म्हाडाच्या ४ हजार २२२ घरांच्या सोडतीसाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:13 IST

ही सोडत यापूर्वी ठरल्याप्रमाणेच ७ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे

पुणे :पुणे म्हाडाच्या (mhada home) वतीने तब्बल ४ हजार २२२ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास १६ डिसेंबरपर्यंत मुदत होती. आतापर्यंत तब्बल ५२ हजार ९२८ लोकांनी अर्ज केले असून, लोकांच्या मागणीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खासगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्येदेखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणेअंतर्गत ८ वी ऑनलाइन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनांतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीच्या शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत ५२९२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३२५५३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. ही सोडत यापूर्वी ठरल्याप्रमाणेच ७ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. केवळ अर्ज भरण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे नितीन माने-पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHomeसुंदर गृहनियोजनMaharashtraमहाराष्ट्र