शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पुणे न्यायालयाचा विस्तार  :नवीन इमारतीचा आराखडा निश्चित  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 3:52 PM

जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा तीनपैकी एक आराकडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगर पालिकेकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देबराकीच्या ठिकाणी उभारण्यात येणार प्रशस्त बिल्डींग, पार्किंगची समस्या मिटणार 

पुणे : जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा तीनपैकी एक आराकडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगर पालिकेकडे पाठविण्यात आला आहे. इमारतीसाठी सधारण १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.          प्रस्तावित इमारतीमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी दोन मजले राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यात सुमारे ४ हजार दुचाकी लावता येवू शकतील. तर ४०० चारचाकी वाहनांसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. १४ कोर्ट हॉल, महिला व पुरुष वकिलांसाठी २ हजार चौरस फुट बार रुम, १ हजार चौसस फुट कॅन्टीन, ७०० आणि ३५० व्यक्ती बसू शकतात अशा शमतेचे दोन हॉल, पोलीस चौकीसाठी जागा, पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहे व आवश्यक सर्व बाबींचा या इमारतीमध्ये समावेश असणार आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, पुणे बार असोसिएशनची कार्यकारणी, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत तीनपैकी एक आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सध्या तो पालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पुर्व झाल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी दिली.       नवीन इमारतीमुळे न्यायालयात भेडसावणारी कोर्टरुम आणि पार्किंगची कमी आता दूर होणार आहे. न्यायालयातील पोलीस चौकी ते पुणे बार असोसिएशनच्या कॅन्टीनपर्यंतच्या जागेत नवीन एल शेप उभारण्यात येईल. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न्यायालय प्रशासनाकडून पाहणी देखील करण्यात आली होती. सध्या न्यायालयत १० हजार ८० चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम करता येवू शकते. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या १.५ एफएसआय नियमानुसार १५ हजार १२० चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकते, असे अ‍ॅड. पावर यांनी सांगितले.       ४० हजार चौरस मीटर बांधकाम शक्य :भविष्यात पुणे मेट्रोमुळे एफएसआय वाढवून मिळाल्यास अतिरिक्तचे बांधकाम करणे शक्य आहे. बांधकामासाठी पाहणी करण्यात आलेली जागा मेट्रोच्या स्टेशनपासून ५०० मीटरच्या अंतरात आहे. मेट्रोअ‍ॅक्टनुसार ५०० मीटरपर्यंत जागेवर बांधकाम करण्यासाठी ४ एफएसआय मिळतो. त्यामुळे या ठिकाणी एकूण ४० हजार ३२० चौरस मीटर बांधकाम करणे शक्य आहे. निवड करण्यात आलेला आराखडा हा ४ एफएसआयप्रमाणे तयार करण्यात आला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे