पीएमआरडीएची हद्दवाढ

By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:39+5:302015-12-05T09:10:39+5:30

पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापलेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ची हद्द आणखी वाढली असून अर्ध्या पुणे जिल्ह्याचा समावेश आता

Extension of PMRDA | पीएमआरडीएची हद्दवाढ

पीएमआरडीएची हद्दवाढ

पुणे : पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापलेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ची हद्द आणखी वाढली असून अर्ध्या पुणे जिल्ह्याचा समावेश आता पीएमआरडीएमध्ये होईल. हद्दवाढीमुळे पीएमआरडीएचे क्षेत्रफळ ३५०० चौरस किलोमीटरवरून तब्बल साडेसात हजार चौरस किलोमीटर होईल. आता साडेचारशे गावांचा समावेश त्यामध्ये झाला आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी शुक्रवारी अधिसूचना काढून पीएमआरडीएची हद्द वाढविली. यामध्ये शिरूर तालुक्यात न्हावरे, गोळेगाव, मलठण, आमदाबाद, आण्णापूर ते शिरूर शहरापर्यंत, दौंड तालुक्यात बोरी पार्धी (केडगाव स्टेशन), पुरंदर तालुक्यात गुऱ्होळी, सिंगापूर, कापूरहोळ, भोंगवली, वेल्हे तालुक्यात आंबवणे, करंजावणे, मार्गासनी, मुळशी तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या ताम्हिणी, धामणओहोळ, मावळ तालुक्यात माळेगाव बुद्रुकपर्यंत, खेड ताुलक्यातील कडूस, चासकमान यापर्यंतचा भाग आता पीएमआरडीएच्या अखत्यारित येणार आहे.

१०० गावे वाढली : एकूण साडेचारशे गावांचा समावेश

पूर्व : शिरूर तालुक्यातील तरडोबाचीवाडी, गोळेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, न्हावरा, खोकडवाडी, आंदळगाव, नागरगाव गावांची पूर्व हद्द ते दौंड तालुक्यातील गणेशरोड, नाणगाव, वरवंड या गावांच्या पूर्व हद्दीपर्यंत.

पश्चिम : मुळशी तालक्ुयातील धामणओहोळ, ताम्हिणी बुद्रुक,
निवे, पिंपरी, घुटके, एकोले, तैलबैला, सालतर, माजगाव, आंबवणे, पेठ शहापूर, देवघर या गावांची पश्चिम हद्द, मावळ तालक्ुयातील आटवण, डोंगरगाव, कुणेनामा, उधेवाडी, जांभवली, कुसूर, खांड, सावले या गावांची पश्चिम हद्द.

दक्षिण : दौंड तालुक्यातील बोरी पार्धी, वाखरी, भांडगाव, यवत, भरतगाव, ताम्हणवाडी, डाळिंब या गावांची दक्षिण हद्द, हवेली
तालुक्यातील शिंदवणे गावाची दक्षिण हद्द, पुरंदर तालक्ुयातील गुऱ्होळीची पूर्व हद्द, सिंगापूर गावाची पूर्व व दक्षिण हद्द, उदाचीवाडी, कुंभारवळण गावांची दक्षिण हद्द ते पिंपळे गावची पूर्व हद्द, बोऱ्हलेवाडी या गावांची पूर्व हद्द, पाणवडी गावची पूर्व व दक्षिण हद्द, घेरा पुरंदर, भैरववाडी, मिसाळवाडी या गावांची दक्षिण हद्द, कुंभोशी गावची पूर्व व दक्षिण हद्द, भोर तालुक्यातील मोरवाडी, वाघजवाडी, भोंगवली, पांजळवाडी, टपरेवाडी, गुणंद या गावांची पूर्व हद्द, गुणंद, वाठारहिंगे, न्हावी, राजापूर, पांडे, सारोळे, केंजळ, धांगवडी, निगडे, कापूरव्होळ, हरिश्चंद्री, उंबरे, सांगवी खुर्द, निधान, दीडघर, विरवडे, जांभळी, सांगवी बुद्रुक या गावांची दक्षिण हद्द, वेल्हे तालुक्यातील आंबवणे, करंजावणे, अडवली, मार्गासनी, आस्कावाडी, विंझर, मळवली, लासीरगाव, दापोडे या गावांची दक्षिण हद्द, खामगाव गावची दक्षिण हद्द ते रुळे, कडवे, वडघर, आंबेगाव बुद्रुक , दिवशी, शिरकोळी, थानगाव, पोळे, माणगाव या गावांची दक्षिण हद्द, मुळशी तालुक्यातील ताव व गडलेगावची दक्षिण हद्दीपर्यंत.

उत्तर : मावळ तालक्ुयाताल माळेगाव बुद्रुक, पिंपरी, माळेगाव खुर्द, इंगळून, किवळे, कशाळ, तलाट या गावांची उत्तर हद्द, खेड तालुक्यातील वाहगाव, तोरणे बुद्रुक, हेतरुज, कोहिंदे बुद्रुक, गारगोटवाडी, कडूस या गावांची उत्तर हद्द, चास गावची पश्चिम हद्द ते कमान, मिरजेवाडी गावांची उत्तर हद्द, काळेचीवाडी, अरुदेवाडी, सांडभोरवाडी, गुळाणी, जऊळके बुद्रुक, वाफगाव, गडकवाडी या गावांची उत्तर हद्द, शिरूर तालक्ुयातील थापेवाडी, माळवाडी, खैरेनागद, कान्हूर मेसाई, मिडगुळवाडी, मलठण, आमदाबाद, आण्णापूर, शिरूर या गावांची उत्तर हद्द.

Web Title: Extension of PMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.