शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

स्फोटाने कुरकुंभ औद्योगिक वसाहत पुन्हा हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 13:03 IST

हा प्लांट स्वयंचलित असल्याने व सुदैवाने रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने परिसरात कामगार नव्हते.

ठळक मुद्देअपघात झालेला पीईए हा प्लांट जून २०१८ मध्ये स्थापनकुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील स्फोटाची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील इटर्निस फाइन केमिकल्स कंपनीतील फिनाइल इथाइल असिटेट (पीईए) या प्लांटमध्ये स्फोट झाला. हा प्लांट स्वयंचलित असल्याने व सुदैवाने रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने परिसरात कामगार नव्हते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. इटर्निस कंपनीत फिनाइल इथाइल असिटेट (पीईए) निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असताना तिसºया मजल्यावर असणाऱ्या हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडच्या फायबर टाकीचा अचानक स्फोट झाला.  या टाकीची साठवण क्षमता ही जवळपास साडेतीन हजार लिटर आहे. प्रक्रियेदरम्यान टाकीत फक्त २२० लिटर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड शिल्लक राहिले असल्याची माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी नामदेव हरिहार यांनी दिली. हा प्लांट सर्व प्रकारे ऑटोमेशन प्रक्रियेनुसार चालतो. यामध्ये मुख्यत्वे करून कामगारांची जास्त गरज भासत नाही. त्यामुळे फक्त तांत्रिकदृष्ट्या माहिती असणारेच यामध्ये कार्यरत असतात. हरिहार यांच्या माहितीनुसार सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरू असताना झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करूनच यामध्ये स्फोट नक्की कसा झाला, हे सांगणे योग्य होणार आहे. कुरकुंभ येथील इटर्निस कंपनी ही एका मोठ्या उद्योगात समावेश असणारी कंपनी आहे. यापूर्वीदेखील यामध्ये अनेक वेळा अपघात झालेले आहेत. त्यामुळे या कंपनीत सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. अपघात झालेला पीईए हा प्लांट जून २०१८ मध्ये स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक सर्व सुविधा देण्यात आल्यामुळेच या अपघाताची व्याप्ती वाढू शकली नाही. टाकीच्या बाजूला असणारी डाइक वाल (सुरक्षा भिंत) असल्याने स्फोट झालेल्या टाकीतील अ‍ॅसिड इतरत्र पसरू शकले नाही. त्यामुळे यामध्ये जीवितहानी अथवा कुठल्याही प्रकारची गंभीर घटना घडली नसल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक विजय खाडे व बसवराज बकील यांनी उपस्थितांना दिली.

टॅग्स :KurkumbhकुरकुंभMIDCएमआयडीसीfireआगBlastस्फोट