खोर यात्रेची उत्साहात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:34 PM2019-04-01T23:34:51+5:302019-04-01T23:35:07+5:30

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : लोकनाट्य कार्यक्रमाला शेकडोंची उपस्थिती

Explain the excitement of Khaar Yatra | खोर यात्रेची उत्साहात सांगता

खोर यात्रेची उत्साहात सांगता

Next

खोर : खोर (ता. दौंड) येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब, श्री काळभैरवानाथ व तुकाईमाता यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गुरुवारी सकाळी श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी माता यांचा महाअभिषेकाने यात्रेच्या धार्मिक विधीला सुरुवात झाली. त्यानंतर हळदी कार्यक्रम झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास श्रींंचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर खोर गावठाणमधून श्रीनाद ढोल पथक विठ्ठलवाडी यांच्या ढोल पथकाने वाजतगाजत व फटाक्यांंच्या आतषबाजीत श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांचा संदलचा कार्यक्रम पार पडला.

शुक्रवारी मुख्य यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी मंगला बनसोडे-नितीन बनसोडे करवंदीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी सकाळी मंगला बनसोडे-नितीन बनसोडे करवंदीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम झाला. रविवारी हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांचा सकाळी चादरचा कार्यक्रम पार पडला आणि खोर यात्रेची सांगता झाली. नागरिकांमध्ये यात्रेप्रति भक्तिभाव असला तरी व्यापाऱ्यांत मात्र दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात खोरचा यात्रा उत्सव पार पडला. या प्रसंगी बाजार समिती सभापती रामचंद्र चौधरी, सरपंच सुभाष चौधरी, उपसरपंच विकास चौधरी, सुहास चौधरी, पांडुरंग डोंबे, गणेश साळुंंके, दिलीप डोंबे, मोहन डोंबे, बाळू डोंबे, भगवान चौधरी, राहुल चौधरी, विजय कुदळे, भानुदास डोंबे, दिलीप डोंबे, प्रकाश चौधरी, यात्रा कमेटी, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

खोरचा चौधरी ठरला आखाड्याचा मानकरी...
शुक्रवारी सायंकाळी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या कुस्ती आखाड्याला सुरुवात झाली. त्यामध्ये दौंड, नगर, कर्जत, वरवंड, पाटस, बारामती, श्रीगोंदा येथील नामांकित पैलवानांंनी हजेरी लावली. शेवटची कुस्ती पै. सागर चौधरी (खोर) विरुद्ध पै. प्रताप हेगडे (वरवंड) यांच्यात झाली. त्यामध्ये सागर चौधरीने प्रताप हेगडेला आसमान दाखवत आखाड्याचा मानकरी होण्याचा मान पटकाविला. सागरला दहा हजरांचे इनाम देण्यात आले. आखाड्याचे समालोचन मेहबूब पठाण व योगेश शिंदे यांनी केले, तर शिवाजी पिसे, राजू डोंबे, भिकू चौधरी, पपन चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
 

Web Title: Explain the excitement of Khaar Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे