पुणेकरांना अनुभव कामी आला, बावधनचा 'गवा' टेकडीवर परतण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By महेश गलांडे | Published: December 22, 2020 02:17 PM2020-12-22T14:17:44+5:302020-12-22T15:01:49+5:30

बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात आज पुन्हा एकदा गव्याचं दर्शन घडलं. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले.

The experience came to the aid of the people of Pune, wild buffelow in pune | पुणेकरांना अनुभव कामी आला, बावधनचा 'गवा' टेकडीवर परतण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

पुणेकरांना अनुभव कामी आला, बावधनचा 'गवा' टेकडीवर परतण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

googlenewsNext

पुणे : बावधन येथील एचसीएमआरएल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ गवा आढळून आला होता. महामार्गावर मोठ्या प्रमाणात असलेली वाहने व एचटीएमएलची भिंत या दोन्हीमध्ये गवा असल्याने त्याला हाताळणे  कठीण जात होते. तसेच, गवा महामार्गावर येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती. अखेर गव्याला परत पाठविण्यात वन विभागातील अधिकाऱ्यांना यश येत आहे. पुणेकरांनी अनुभवतातून शहाणपणा शिकला अन् यावेळी गवा सुखरुप जंगलात परतेल असं दिसून येतंय.

बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात आज पुन्हा एकदा गव्याचं दर्शन घडलं. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी अतिशय काळजीपूर्वक रेस्क्यू करण्याचे काम सुरू करुन नागरिकांची गर्दी होणार नाही, याचीही काळजी प्रशासनाने घेतली. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने परत जाऊ देणं हेच योग्य ठरेल, असं उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते.

कोथरुडमधील गव्याचा मृत्यू

१३ दिवसांपूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा गवा आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोथरूडमध्ये आलेल्या गव्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. 

गवा सुखरुप परतण्यसााठी शर्थीचे प्रयत्न

आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडाली. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश मिळालंय. परिसराची संपूर्णपणे पाहणी करून गव्याला एचईएमआरएल च्या कंपाउंडमध्ये असलेल्या जंगलामध्ये परत पाठवण्यासाठी आखणी करण्यात आली. त्यानंतर, महामार्ग लगत संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्या, अखेर महामार्गालगत तात्पुरते संरक्षण तयार करून त्याला पुन्हा त्याच्या आदिवासामध्ये सोडण्यात सर्वच यंत्रणांना यश आले. गवा टेकडीकडे परतला असून लवकरच जंगलात निघून जाईल. त्यासाठी, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: The experience came to the aid of the people of Pune, wild buffelow in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.