शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शहरातील ओढे-नाले सफाईवर पाच वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 07:00 IST

तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे...

ठळक मुद्देनाले सफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च :तरीही तुरळक पावसाने शहर तुंबतेशहरामध्ये सुमारे ३६२ किलो मिटरचे २३४ नाले व उपनाले

पुणे : महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत शहरातील ओढे-नाले, पावसाळी गटारांची स्वच्छता व सफाईसाठी तब्बल ११ कोटी १३ लाख २९ हजार रुपयांचा खर्च केला आहे. महापालिकेकडून नाले सफाईवर दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन देखील पहिल्याच व तुरळक पावसाने देखील शहरातली बहुतेक सर्व रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरुप येते. तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे.पुणेकरांचा पावसाळा सुखकर जावा यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामांपैकी सर्वांत महत्वाचे काम म्हणजे शहरातील ओढे-नाले व पावसाळी गटारांची सफाई. सध्या संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे ३६२ किलोमीटरचे २३४ नाले-उपनाले अस्तित्वात आहेत. महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी शहरातील सर्व ओढे-नाले, पावसाळी गटारे यांची सफाई केली जाते. या ओढे-नाले सफाईवर दर वर्षी सरासरी दीड ते दोन कोटी रुपये खर्च केला जातो. यंदा देखील शहरामध्ये शंभर टक्के नाले साईफ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, हा दावा शहरामध्ये झालेल्या पाहिल्याच पावसात वाहून गेला. शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर साठलेले पाणी व त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांची पुरती दैना उडाली आहे. ---शहरातील ६० टक्के रस्त्यांवर पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्थाच नाहीसध्या शहरामध्ये सुमारे १४०० किलो मिटरचे रस्ते असून, यापैकी तब्बल ६० टक्के रस्त्यांवर गटारांची व्यवस्थाच नसल्याचे महापालिकेतील अधिकृत सुत्रांनी सांगितले. शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीची कोणतीही व्यवस्था नसल्यानेच पावसाची एखादी चागंली सर येऊन गेली तरी रस्त्यांना ओढा-नाल्याचे स्वरुप येते. रस्त्यांवर गटारांची व्यवस्था नसली रस्ते करताना पाणी सहजरित्या वाहून जाईल याची कोणतीही सोय महापालिकेकडून केलेली नाही. यामुळे देखील बहुतेक सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ----शहरामध्ये ओढे-नाले दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत झालेला खर्चपरिमंडळ कार्यालय    ओढे-नाल्यांची संख्या    खर्चपरिमंडळ क्रमांक १    ३९        १ कोटी ५६ लाख ६९ हजारपरिमंडळ क्रमांक २    ७६        ३ कोटी २८ लाख ६५ हजारपरिमंडळ क्रमांक ३    ६४        २ कोटी ३० लाख ७२ हजारपरिमंडळ क्रमांक ४    २७        १ कोटी ३२ लाख ६८ हजारपरिमंडळ क्रमांक ५    ११        २ कोटी ६४ लाख २९ हजार

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातRainपाऊस