शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळ विस्तारणार

By admin | Updated: March 12, 2017 03:14 IST

लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल तसेच कार्गो कॉम्प्लेक्स आणि चार नवीन विमान पार्किंगला विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत शनिवारी अंतिम मंजुरी

पुणे : लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल तसेच कार्गो कॉम्प्लेक्स आणि चार नवीन विमान पार्किंगला विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत शनिवारी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असून प्रवाशांनाही अनेक सोयी-सुविधा मिळणार आहेत.विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत शनिवारी लोहगाव विमानतळ येथे बैठक झाली. यामध्ये विमानतळावर करण्यात येणा-या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस विमानतळ संचालक अजय कुमार, मराठा चेंबर आॅफ कॉर्मर्स चे अनंत सरदेशमुख, येरवडा पोलिस स्टेशन चे वाहतूक अधिकारी बाजीराव मुळे आदि उपस्थित होते. या बैठकीत नवीन टर्मिनल इमारत व कार्गो ची निर्मितीसाठी ४७५ कोटी ३९ लाख रुपये, ४ नवीन विमान पार्किंग आणि टॅक्सी लिंक रोडसाठी १७ कोटी ७ लाख रुपये आणि टर्मिनलमधील विद्युतीकरणासाठी १० कोटी ६ लाख रुपयांच्या कामांना अंतिम मंजूरी देण्यात आल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. त्याचप्रमाणे विमानतळाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील ०.७५ एकर जागा भारतीय हवाई दलाकडून प्रवेश रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मिळणार असल्याचे देखील शिरोळे यांनी संगितले. नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल. असे सरदेशमुख यांनी सांगितले.कार्गो कॉम्प्लेक्सचा उद्योगांना लाभलोहगाम विमानतळावरील अपुऱ्या जागेमुळे माल वाहतुक करण्यास मोठी मर्यादा होती. पुण्यातील ३० टक्क्यांहून अधिक मालवाहतुकीसाठी मुंबईला जावे लागत होते. नवीन कार्गो कॉम्प्लेक्सला मंजुरी मिळाल्यामुळे येथूनच मालवाहतुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खर्चातही मोठी वाढ होते. ‘या कॉम्प्लेक्समुळे आयात व निर्यातदारांना मोठा फायदा होईल,’ असे अजय कुमार यांनी सांगितले.