शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार करा -मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:33 IST

पुणे महापालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा.

- अंबादास गवंडी पुणे :पुणेमेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रोतून जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी सेवा असावी. पुण्याच्या सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून वाहतूक नियोजनासंदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवे पर्याय सुचविले आहेत. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर यांच्यासोबत झाली. यावेळी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

-खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका

पुणे महापालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मंजूर मेट्रो मार्गात समाविष्ट करून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ-खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.

२) खराडी येथे इंटरचेंज मल्टीमाॅडेल ट्रान्सस्पोर्ट हब विकसित करावे.

खराडी आणि परिसराचा झपाट्याने विकसित होत असून, यासाठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरून जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल.

-कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा !

पुण्यातील वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून, यात कात्रज-चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे मंत्री मोहोळ यांनी सूचित केले आहे.

-भुसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी.

- वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून, वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरूपात करावा.

पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन भविष्याचा विचार करून करणे गरजेचे आहे. मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुणे शहरात मेट्रोचे जाळे अधिक प्रमाणात विस्तारत आहे. मेट्रोच्या या विस्ताराचा अधिकाधिक पुणेकरांना फायदा व्हावा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रोने जोडले जावेत. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रmurlidhar moholमुरलीधर मोहोळMetroमेट्रो