शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

कसरत... जगण्यासाठी... टिचभर पोटासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 2:13 AM

दोन वेळच्या जेवणासाठी चिमुकले जिवावर उदार

राजुरी : आकाशात उंच भरारी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपल्या स्वप्नासाठी जगत असते, तर कोणी ते पूर्ण करण्यासाठी झगडत असते. पण सोनिया लढते दोन वेळेचे अन्न मिळविण्यासाठी. शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपणे बागडण्याच्या वयातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलत ती दोरीवर कसरतीचे खेळ करून पैसे मिळवत आहे.आपले चौकोनी बिºहाड घेऊन छत्तीसगड राज्यातील विलासपूरमधील अजयकुमार नाट तरुण पोटासाठी भटकत जुन्नर तालुक्यातील बेल्ह्यापर्यंत पोहोचले. कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जास्त पैसे मिळतील, या आशेने आठवडेबाजाराच्या दिवशी हे डोंबारी कुटुंब दोरीवरचे खेळ करून प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. सोनिया अजयकुमार नाट (वय ७) दोरीवर चालण्याच्या चित्तथरारक कसरती स्वत:च्या जिवाची बाजी लावत उपस्थितांचीकरमणूक करून आपल्या कुटुंबाचा आधारवड बनली आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या कळ्यांची दखल शासन घेईल तेव्हा घेईल; परंतु आज तरी ही अबोध कलिका आपले कुटुंब जगविण्यासाठी दररोज दोरीवरच्या जीवघेण्या कसरती करीत आहे.रस्त्याच्या कडेला सहा बांबू रोवून वीस फूट लांबीचा दोर बांधून सुमारे १० फूट उंचीच्या दोरीवरून एकावर एक तीन भांडी रचून, कधी चपला, कधी अनवाणी, तर कधी स्टीलच्या ताटावरून जीवघेण्या कसरती करीत आहे. यातूनच आई-वडील व लहानग्या बहिणीसह कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मुक्कामासाठी वर आभाळ खाली धरती अशा परिस्थितीत एक जुनी दुचाकी, चार-सहा बांबू, दोरी, चार गोधड्या असा फाटका संसार घेऊन गावोगाव भटकणाºया या बिºहाडापर्यंत विकास कसा आणि कोठून पोहोचणार, असा प्रश्न पडतो.तिच्या कसरतीच्या खेळावरच आमचे पोट असल्याने शाळेत जाणे हा प्रकार आम्हाला माहीतच नाही, असेच भटकत भटकत व कसरतीचे खेळ करीत आम्ही वर्षातून कधीतरी एकदा गावाकडे जातो.- अजयकुमार नाट, सोनियाचे वडील

टॅग्स :Puneपुणे