शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Exclusive: पुणे महापालिकेची गरिबांसाठी घरं ? 'लोकमत'च्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 21:35 IST

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने महापालिकेचा ताब्यातील सदनिका तिथे राहत असलेल्या पुनर्वसन झालेल्या नागरिकांना विकायचा निर्णय घेतला आहे.

प्राची कुलकर्णी - 

पुणे : पुणे महापालिकेने त्याांच्या ताब्यातील सदनिका विक्रीचा निर्णय तर घेतला आहे. पण प्रत्यक्षात पालिका दावा करत असलेल्या संख्येने सदनिकाच महापालिकेचा ताब्यात नाहीयेत. त्यातच अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचा ऐवजी भलतेच लोक या सदनिकांमध्ये राहत आहेत. त्यामुळे नक्की कोणचा फायद्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने महापालिकेचा ताब्यातील सदनिका तिथे राहत असलेल्या पुनर्वसन झालेल्या नागरिकांना विकायचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा मते गरिबांना स्वस्त दरात घरे मिळायला यामुळे मदत होईल. मात्र तीन महिने भाडे न भरलेल्या लोकांना घराबाहेर काढलं जाईल आणि महापालिका ती जागा ताब्यात घेईल अशी अट या प्रस्तावात टाकण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकारण देखील सुरू झालं आहे. 

पण 'लोकमत'ने या फ्लॅट्सची पाहणी केली तेव्हा काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महापालिकेचा मते त्यांनी महिना ४०० रुपये आकारून प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या या घरांमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्त राहताच नसल्याचं अनेक ठिकाणी समोर आलं. अनेक घरांमध्ये भाडेकरू राहत आहेत. महापालिकेचा अधिकाऱ्यांना या प्रकल्पग्रस्तांचा ऐवजी कोणी तरी दुसरे कोणी राहत असल्याचे त्यांचा सर्वेक्षणात लक्षात आले असल्याचे देखील रहिवाशांनी सांगितले मात्र तरीदेखील काही कारवाई करायची तसदी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

दुसरीकडे काही प्रसिद्ध संकुलानमध्ये महापालिकेचा लेखी सदनिका आहेत २४ आणि त्यातल्या १९ सदनिका लोकांना दिलेल्या देखील आहेत. पण प्रत्यक्ष इमारती मध्ये प्रत्येकी २बीएचके फ्लॅट मध्ये ५ कुटुंब राहत आहेत. म्हणजे पालिकेचा नोंदींचा आणि प्रत्यक्ष उपलब्धतेचा देखील ताळमेळ नाही.इथली एक खोली ही एक युनिट म्हणजे एक घर असे गृहीत धरले गेल्याने हा आकडा २४ झाल्याचं इथल्या रहिवाशांनी सांगितलं. 

दरम्यान या फ्लॅट विक्रीचा प्रस्तावाबाबत मात्र त्यांचा संमिश्र प्रतिक्रया होत्या. काही जणांच्या मते काही लाखांची रक्कम उपलब्ध करणे देखील अवघड आहे. तर काही जण मात्र कर्जाची सोय झाली तर घराचं स्वप्नं पूर्ण होईल असे म्हणाले.

हा संपूर्ण प्रकार धूळफेक असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. ते म्हणाले," या सदानिकांमध्ये नेमके कोण राहते त्याचा हिशोब आम्ही करणार आहोत.हा सरळ सरळ लोकांना घराबाहेर काढून ही घरं बिल्डरांचा घशात घालण्याचा प्रकार आहे."

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले," भाडेकरू असलेल्या कोणालाही आम्ही काढणार नाहीये. हा प्रस्ताव हा विक्रीसाठी आहे.ज्यांना घरे विकत घ्यायची  नाहीत त्यांच्यासाठी आहे. तसंच भाडे भरून राहायची सोय आहे. त्यामुळे कुठलेही घर कोणाकडूनही काढून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही"

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसHomeघर