शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

जीवनावश्यक वस्तू जीएसटीमधून वगळा; दि पूना मर्चंट्स चेंबरचे पंतप्रधानांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:53 PM

सर्व जीवनावश्यक वस्तू शासनाच्या जीएसटी करामधून वगळण्यात याव्यात, असे निवेदन दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच देण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे'जीएसटी रिटर्नस (खरेदी-विक्रीची माहिती) भरण्यासाठी मुदत किमान दर तीन महिने करावी'वस्तू सेवा कर प्रशासकीय सल्लागार मंडळाने त्वरित निर्णय घेणे : पोपटलाल ओस्तवाल

पुणे : मिरची पावडर, धना पावडर, हळद, शेंगदाणा, खाद्यतेल, तांदूळ (ब्रॅन्डेडसहित) या सर्व जीवनावश्यक वस्तू शासनाच्या जीएसटी करामधून वगळण्यात याव्यात, असे निवेदन दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच देण्यात आले आहे. याबाबत चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले, की  मिरची पावडर, धना पावडर, हळद, शेंगदाणा, खाद्यतेल, तांदूळ या सर्व वस्तू सर्वसामान्य भारतीयांच्या नियमित वापरातील व आहारातील अत्यावश्यक वस्तू आहेत. या वस्तूवर यापूर्वी कोणत्याही स्वरुपाचे कर लावले जात नव्हते. परंतु शासनाने या सर्व वस्तूना वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावल्याने भावामध्ये वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्यात राहण्यासाठी या वस्तूवरील जीएसटी रद्द करावा, अशी प्रमुख मागणी मर्चंट्सच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय करप्रणालीत वारंवार भराव्या लागणाऱ्या (महिन्यातून तीनदा) रिटर्नस् मुळेदेखील व्यापारी प्रचंड हैराण आहेत. त्यामुळे शासनाने जीएसटी रिटर्नस (खरेदी-विक्रीची माहिती) भरण्यासाठी मुदत किमान दर तीन महिने करावी, वस्तू सेवा कर प्रशासकीय सल्लागार मंडळाने त्वरित निर्णय घेणे, आदी अनेक मागण्या करण्यात आल्या असल्याचे पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.

टॅग्स :GSTजीएसटीthe poona merchants chamberदि पुना मर्चन्ट्स चेंबर