शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातल्या गरवारे शाळेतील खळबळजनक घटना! मित्राचा खून करून स्वतःच येऊन पोलिसांना सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 12:05 IST

बंद शाळेत तरुणाचा खुन, तब्बल एक दिवस मृतदेह पडून होता शाळेत

ठळक मुद्देमध्यरात्री दारु पित बसलेल्या मित्रांमध्ये झालेल्या वादातून घडला होता हा प्रकार

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्यासमोरील गरवारे प्रशालेत मध्यरात्री दारु पित बसलेल्या मित्रांमध्ये झालेल्या वादातून तरुणाचा खुन करण्यात आला.राजन रमेश सहानी (वय २७, रा. वारजे नाका) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा (वय २१, रा. श्रमिक वसाहत, कर्वे रोड) याला अटक केली आहे.

याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, राजन हा पेटिंगचे काम करतो. राजन आणि किसन दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे. किसन काहीही कामधंदा करीत नाही़ रविवारी दुपारी दोघेही दारु पिण्यासाठी अड्ड्यावर आले होते. तेथून ते सिंहगडावर गेले. तेथे त्यांनी दारु पिली. रात्री उशीर झाल्याने किसन हा राजनला घेऊन गरवारे शाळेत आला. किसन हा तेथे शिकला असल्याने रात्री उशीर झाल्यावर तो कंपाऊंडवरुन उडी मारुन येथील व्हरांड्यात झोपत असे. त्याप्रमाणे दोघेही कंपाऊंडवरुन उडी मारुन आत आले.

दुसर्‍या मजल्यावरील व्हरांड्यात त्यांनी पुन्हा उरलेली दारु पिली. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. सध्या शाळेत रंगकाम सुरु आहे. तेथे एक फावडे पडले होते. ते राजनने किसनच्या हातावर मारले. त्यामुळे किसन याने भिंतीवरील फायर सेफ्टीचा लाल डब्या काढून राजनच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने राजन जागेवरच निपचित पडला. त्यानंतर किसन याने त्याला ओढत एका क्लासरुममध्ये नेले. तेथे पुन्हा त्याला दोन तीन वेळा मारले. त्यानंतर तो सकाळ झाल्यावर घरी निघून आला. 

इकडे राजन परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. शेवटी मंंगळवारी दुपारी त्यांनी वारजे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, किसन हा बुधवारी पहाटे पुन्हा गरवारे प्रशालेत आला. त्याने कंपाऊंटवरुन उडी घेऊन आत प्रवेश केला. काल ते बसले होते, त्या दुसर्‍या मजल्यावरील क्लासरुममध्ये गेला. तेव्हा त्याला राजनचा मृतदेह तेथेच पडलेला दिसून आला. त्यानंतर तो थेट समोरील डेक्कन पोलीस ठाण्यात आला. त्याने स्वत: पोलिसांना मला अटक करा, मी मित्राचा खुन केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गरवारे शाळेत जाऊन खात्री केली. तेव्हा तेथे राजन याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन किसन वरपा याला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू