शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जात पंचायतीने कुटुंबाला केले एका वर्षासाठी बहिष्कृत; पुरंदर तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 20:33 IST

जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी..

ठळक मुद्देभातू समाजाचा निर्णय : गराडे येथील घटना, बहिष्कृत कुटुंबाची पोलिसांकडे धाव

सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून १ वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा ठराव केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथे घडली. जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी करण्यात आली. ती न दिल्यास जात पंचायतीने कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठात सुरेश रत्न बिनवात (रा. सत्वनगर, महंमदवाडी), सप्त पन्नालाल बिनवात (रा. सत्वनगर), नंदू आत्राम रजपूत (रा. वारजे जकात नाक्याजवळ), मुन्ना रमेश कचरावत (रा. वारजे माळवाडी), आनंद रामचंद्र बिनावत (रा. सातवनगर), देविदास राजू चव्हाण (रा. नऱ्हे गाव), देवानंद राजू कुंभार (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथील असल्याने हा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सुहानी ऊर्फ रिटा विकास यांचे वडील मनोज रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. सुहानी यांची आई नंदा मनोज कुंभार या धनकवडी येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे पंच सुरेश बिनवात व मुन्ना बिनवात व इतर सुहानी यांच्या मागे त्यांच्या मालमत्तेचा निवाडा करण्याचा आग्रह धरत होते. याला त्यांच्या आई नंदा कुंभार यांनी नकार दिला. यामुळे त्यांना पंचांनी शिवीगाळ केली. ही बाब नंदा यांनी त्याची मुलगी सुहानी हिला सांगितले. यावर सुहानी यांनी समाजाच्या ग्रुपवर मेसेज करत माझ्या आईला व बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत सुरेश बिनावत यांनी समाजातील १२ गावचे पदाधिकारी, १२ जातीचे सर्व पाहुणे मित्र मंडळी यांना गेल्या महिन्यात ३ नोव्हेंबरला राजलीला मंगल कार्यालय येथे उपस्थित राहण्यास सांगत रिटा व पूजा या दोघी बहिणींना सर्व समाजासमोर माझी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांनी १ वर्षासाठी बहिष्कृत केले तसेच त्यांना दंड ठोठावला. तसा व्हिडीओ समाजाच्या ग्रुपवर पाठवला. याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :PurandarपुरंदरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी