शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात खळबळ! फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 21:12 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी चार दिवसांची कोठडी...

कोरेगाव भीमा (पुणे) : पुणे पालिकेचे एका माजी नेत्याच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या शेतमजुराच्या मुलाने नातेवाईक मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने येत्या १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. मात्र हा प्रकार फार्म हाऊस घडल्यामुळे प्रकार दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडचे तृप्ती देसाई यांनी केला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या विशाल दामोदर गायकवाड (वय २१, मूळ रा. हळणी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीतील एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर शेतमजूर म्हणून पीडित मुलीच्या आई-वडिलांसह इतरही काही कुटुंबीय कामास आहेत. पीडित मुलीचे आई-वडील बाहेर गेलेले असताना त्यांच्याच नात्यातील विशाल गायकवाड याने पीडितेला बळजबरीने पकडून घरामागे नेत जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.

तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगू नको म्हणूनही धमकावले. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने याबाबत आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून विशाल गायकवाड याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला तातडीने अटक केली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, अधिक तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, पीडित मुलीला तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यात आली असून, तपास यंत्रणेवर कोणताही दबाव नसल्याचे सांगत या प्रकरणाशी फार्म हाऊस मालकाचा संबंध नसल्याचेही पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग