इंदापुर नगरपरिषदेत ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:03+5:302021-02-05T05:09:03+5:30
यावेळी श्री. नारायणदास रामदास हायस्कुलच्या बँड पथकाने सुरेल अशा स्वरात राष्ट्रगीत सादर केले. तर अंजली जाधव या विद्यार्थ्यांच्या पथकाने ...

इंदापुर नगरपरिषदेत ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
यावेळी श्री. नारायणदास रामदास हायस्कुलच्या बँड पथकाने सुरेल अशा स्वरात राष्ट्रगीत सादर केले. तर अंजली जाधव या विद्यार्थ्यांच्या पथकाने देशभक्तीपर गीत गायले. त्यामुळे वातावरण आनंदी झाले. तर यावेळी उपस्थित सर्वांना प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर यांनी माझी वसुंधरेची शपथ दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राजश्री अशोक मखरे, हेमलता माळुंजकर, स्वामीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा चित्तरंजन पाटील, सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढवळे, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, विशाल साळुंखे, प्रा.अशोक मखरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजेंद्र चौगुले, सचिन चौगुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : इंदापूर नगरपरिषदेसमोर ध्वजारोहण करताना नगराध्यकक्षा अंकिता मुकुंद शहा व मान्यवर