पुणे : शहरातील माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी तसेच शौर्यपदक विजेते माजी सैनिक यांच्या कुटुंबीयांना मिळकतकरात १०० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने मान्य करण्यात आला.
महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, शहिदांच्या पत्नी, संरक्षण दलातील शौर्यपदक विजेते सैनिक यांना सर्वसाधारण मिळकतकरात सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करून मुख्य सभेकडे पाठवला होता. त्यानुसार आज तो मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी आला. त्यावेळी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केवळ सर्वसाधारण करात सवलत न देता संपूर्ण मिळकतकरात सूट देण्याची मागणी केली. त्यानंतर सर्वपक्षीय उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
-------
शहरातील माजी सैनिक, हुतात्मा पत्नी, तसेच शौर्यपदक विजेते यांचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे महापालिका हद्दीतील दहा हजारांपेक्षा अधिक माजी सैनिकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
-------