शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune: आंबेगाव तालुक्यात भरकार्यक्रमात माजी सरपंचावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 14:33 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर येथे समाईक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपावरून झालेल्या भांडणातून केला हल्ला

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर येथे समाईक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपावरून झालेल्या भांडणातून माजी सरपंच संजय दिगंबर पोखरकर (वय ४९) यांच्यावर लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी संतोष राजगुडे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहिती या बाबत संजय पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वडगाव पीर येथे यात्रा उत्सव चालू होता. यात्रा उत्सवा दरम्यान शनिवारी रात्री ११ वाजता मंगला बनसोडे यांचे लोकनाट्य तमाशा सुरू असताना मान्यवरांचा मानसन्मान करण्यासाठी संजय पोखरकर व इतर ग्रामस्थ यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून स्टेजवरून उठून रात्री १ च्या सुमारास पन्नास फूट अंतरापर्यंत चालत गेले. त्यावेळी संतोष कचरू राजगुडे (रा.वडगावपीर) याने पोखरकर यांच्या सामायिक असलेल्या बोरवेलच्या पाण्याच्या वाटपाचा राग मनात धरून पाठीमागून येऊन लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात पोखरकर यांच्या कानाच्या मागे, टाळू व कपाळावर तसेच मनगटावर गंभीर जखमा झाल्या आहे. त्यांच्या सोबत असणारे सावळेराम फकीरा आदक यांच्या हातावर वार लागून जखम झाली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी संतोष कचरू राजगुडे यास पकडून पोखरकर व सावळेराम आदक यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक उमेश चिकणे करत आहेत.

टॅग्स :ambegaonआंबेगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsarpanchसरपंच