Video: मतदानावेळी ईव्हीएमची हळद-कुंकवाने पुजा अन् आरती; पुण्याच्या भोरमधील खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:08 IST2025-12-02T11:07:44+5:302025-12-02T11:08:04+5:30
Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील या धक्कादायक प्रकारानंतर ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

Video: मतदानावेळी ईव्हीएमची हळद-कुंकवाने पुजा अन् आरती; पुण्याच्या भोरमधील खळबळजनक प्रकार
पुणे : राज्यात २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. सर्वत्र निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. नागरिक सकाळपासुन मतदानासाठी बाहेर पडले आहेत. पुण्यातही १२ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायत मिळून आतापर्यंत ८.३७ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु आहे. तर काही भागात चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे. अशातच भोर नगरपरिषदच्या मतदान केंद्रावरून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
भोरमधे मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. भोरमधे मतदानावेळी EVM मशीनची हळद-कुंकवाने पुजा करत आरती केली असल्याचे दिसत आहे. भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील या धक्कादायक प्रकारानंतर ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भोर येथील मतदान केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईव्हीएमची आरती झालेल्या मतदान केंद्रावर नवीन केंद्रप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने ही कारवाई केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून 8.37% मतदान झाले आहे. तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.