शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सर्वांना घरे, पर्यावरण जपण्याचा संकल्प

By admin | Updated: March 31, 2017 03:13 IST

महापालिकेच्या आगामी (सन २०१७-१८) या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये सर्वांना घरे, शाश्वत वाहतूक, समान

पुणे : महापालिकेच्या आगामी (सन २०१७-१८) या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये सर्वांना घरे, शाश्वत वाहतूक, समान पाणीपुरवठा, आॅनलाइन सुविधांमध्ये वाढ, कचरा प्रश्नाची सोडवणूक, पर्यावरणपूरक विकास आदींचा संकल्प करण्यात आलेला आहे. पुणेकरांच्या समस्यांचा अभ्यास करून त्याच्या सोडवणुकीसाठी अंदाजपत्रकामध्ये प्रयत्न करण्यात आला असल्याची ग्वाही महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली. महापालिकेचे ५ हजार ६०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक कुणाल कुमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ यांना गुरुवारी सादर केले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे उपस्थित होते. शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकातून करण्यात आल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले.शहरातील बहुसंख्य नागरिकांना स्वत:चे घर नाही, त्यामुळे शहरात बेसुमार झोपडपट्ट्यांची वाढ झाली आहे. तिथल्या कुटुंबीयांना घरे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तसेच सर्वांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या जागांवर म्हाडाच्या मदतीने घरे बांधून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.शहरामध्ये वाहतूक ही सर्वांत मोठी समस्या आहे. या समस्येची सोडवणूक करण्यासाठी शाश्वत वाहतूक व्यवस्था उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत औंध व सातारा रस्त्यावर बीआरटी प्रकल्पाची उभारणी केली जाईल. पीएमपीसाठी नवीन बस खरेदी केल्या जाणार आहेत. शहरात ठिकठिकाणी सायकलसाठी पायाभूत व्यवस्था तयार करून सायकल शेअरिंग यंत्रणा उभारली जाणार आहे. (प्रतिनिधी)शाश्वत वाहतूक : सेवासुविधा आॅनलाईन देणारनदीसुधारणा प्रकल्पांतर्गत सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचबरोबर नदीकाठ सुंदर केला जाणार आहे. संपूर्ण शहरात एलईडी दिव्यांचा एकात्मिक प्रकल्प राबविला जात आहे. रस्ते स्वच्छतेसाठी अ‍ॅटोमेटीक रोडस्वीपिंग वाहने खरेदी केली जाणार आहेत.शहरातील नागरिकांना महापालिकेच्या बहुतांश सेवासुविधा आॅनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांशी जास्तीत जास्त संवाद साधून त्यांच्या गरजा विचारात घेऊन बदल केले जाणार आहेत. शहराच्या सर्व भागांना २४ तास व एकसमान पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत १६०० किमी लांबीची वितरण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. त्याचबरोबर ८२ नवीन पाण्याच्या टाक्या शहरात बसविल्या जातील. प्रमुख जमा बाबीस्थानिक संस्था करया विभागातून १ हजार ७३० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. हे सर्व उत्पन्न अनुदान स्वरूपात आहे. तसेच केंद्र सरकारने जुलै २०१७ पासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) प्रणाली लागू केल्यामुळे त्यापोटी किती अनुदान मिळणार, हे अद्याप निश्चित नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.मिळकत करसन २०१७-१८ साठी या विभागातून १ हजार ३३३ कोटी ६० लाख रुपयांची वसुली अपेक्षित धरण्यात आली आहे. जीआयएस या नव्या प्रणालीचा स्वीकार केल्यामुळे यावर्षी ३०० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न अपेक्षित आहे, असे आयुक्त म्हणाले.बांधकाम परवानगी विकास शुल्कयावर्षी या विभागाच्या उत्पन्नात बाजारपेठेतील मंदी व अन्य काही गोष्टींमुळे ५०० कोटी रुपयांची घट झाली. मात्र आगामी काळात या क्षेत्रात वृद्धी अपेक्षीत असून त्यामुळे सुमारे १ हजार २५ कोटी ५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रीमियम एफएसआय पद्धतीमुळे जास्त पैसे मिळतील.पाणीपट्टी२४ तास पाणी योजनेतंर्गत मीटर पद्धतीने होणारा पाणीपुरवठा तसेच वाढीव दराने आकारली जाणारी पाणीपट्टी यामुळे या विभागातून सन २०१७-१८ साठी ३१९ कोटी ६७ लाख रुपयांची वसुली अपेक्षित धरण्यात आली आहे. इतरसरकारी अनुदान३२९ कोटीअन्य जमा६०१ कोटीकर्ज / रोखे२६१ कोटी थकबाकी वसुलीकडे दुर्लक्ष करून करवाढमहापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकत करात १२ टक्के तर पाणीपट्टी करामध्ये १५ टक्क्यांची वाढ प्रस्तावित केली आहे. त्यातून पालिकेला केवळ १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे. मात्र सध्या मिळकत कराची ७५० कोटी तर पाणीपट्टीची ३५० कोटी थकबाकी आहे. त्याचबरोबर पालिकेने भाड्याने दिलेल्या जागांचीही मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी प्रशासनाने वसूल केली तर पालिकेला करवाढ करण्याची आवश्यकता पडली नसती.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे, रिपाइंचे डॉ. सिद्धार्थ धेंडे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, मुख्य लेखा व वित्ता अधिकारी उल्का कळसकर तसेच भाजपाचे नव्यानेच निवडून आलेले अनेक नगरसेवक व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सुमारे सव्वातास केलेल्या भाषणात आयुक्तांनी त्याचा गोषवारा सादर केला. पाणीपुरवठापाणीपुरवठा विभागात सर्वाधिक महत्त्वाची योजना २४ तास पाणीपुरवठा हीच आहे. ३ हजार ३३० कोटी रुपयांच्या या योजनेत २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सेबी तसेच राष्ट्रीय मान्यताप्राप्त अशा वित्त संस्थांनी महापालिकेचा आर्थिक ताळेबंद तपासून महापालिकेला ‘डबल प्लस ए’ असे मानांकन दिले आहे. त्यामुळे कमी व्याजाने कर्ज मिळू शकते, असे ते म्हणाले. अंदाजपत्रकात या विभागासाठी १ हजार १४० कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे.मैलापाणी शुद्धीकरणशहरातील ७४४ दशलक्ष लिटर प्रतिदिन निर्माण होणाऱ्या मैलापाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नदीसुधार योजनेतंर्गत जपान सरकारच्या जायका संस्थेकडून केंद्र सरकारला कर्ज मिळणार आहे. त्यातील काही भाग मैलापाणी शुद्धीकरण केंद्र तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने अंदाजपत्रकात या कामासाठी महापालिकेचा सहभाग म्हणून २०० कोटी रुपयांची तरतूद आहे.घनकचरा व्यवस्थापनकचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याबरोबरच यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी राडारोड्यावर (डबर) प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठीची निविदा प्रक्रियाही सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कचऱ्यापासून वीजनिर्मिती, उरुळी देवाची, फुरसुंगी येथे मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.आरोग्यसाथीचे आजार आल्यानंतर कराव्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या तपासण्यांची व्यवस्था आता आऊटसोर्सिंगद्वारे महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही करण्यात येणार आहे. त्याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयांमधील माता व बालके यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबवण्यात येणार आहेत. यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.वाहतूक नियोजनयात महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या लुल्लानगर उड्डाणपूल, अलंकार चित्रपटगृहाजवळ रेल्वे ओव्हरब्रीज बांधणे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच प्रामुख्याने मेट्रो रेल, शहर एकात्मिक सायकल आराखडा याचा उल्लेख करण्यात आला आहे. या विभागासाठी १६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पीएमपी पीएमपीसाठी ३९२ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद आहे. १ हजार ५०० पैकी ८०० बसेसची खरेदी डेपो डेव्हलपमेंट, मिनी बसेस याचा त्यात समावेश आहे. उद्यान विभाग३४ कोटी रुपयांची तरतूद आहे. यात पु. ल. देशपांडे उद्यानाचा दुसरा टप्पा, तळजाई टेकडी येथील नियोजित जैवविविधता उद्यान याचा समावेश आहे.विद्युत विभागयासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद आहे. शहरातील सर्व पथदिवे एलईडी करणे, महापालिकेच्या नाट्यगृहातील विद्युतीकरण, उड्डाणपुलांवर आकर्षक विद्युत योजना याचा त्यात समावेश आहे.भवन रचना१४० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने मनपाच्या मुख्य कार्यालयाशेजारच्या विस्तारीत इमारतीचा समावेश आहे.माहिती तंत्रज्ञानसंगणक साक्षरता वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात १०० ई-माहिती केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या सर्व सेवा आॅनलाईन करण्यात येतील. यासाठी ४५ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद आहे.हेरिटेज सेलमहापालिकेच्या या वैशिष्ट्यपूर्ण विभागासाठी २७ कोटी २९ लाख रुपये अंदाजपत्रकात ठेवण्यात आले आहेत. शहरातील नानावाडा, विश्रामबाग, कसबा गणपती, मंडई या ऐतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण पूर्ण झाले असून आता पुढील वर्षात लाल महाल, त्रिशुंड्या गणपती तसेच विशेष बाब म्हणून सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.शिक्षण मंडळप्राथमिक शिक्षणासाठी ३११ कोटी रुपयांची तसेच दुय्यम शिक्षणासाठी ५५ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद आहे. आगामी काळात महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू करणे, गुणवंत शिक्षकांसाठी शिक्षण उत्सव व्यासपीठ सुरू करणे, अशा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.