शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबावर मोठा आघात, सर्वजण धक्क्यात आहोत; मामांच्या हत्येनंतर योगेश टिळेकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:45 IST

घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही.

Yogesh Tilekar ( Marathi News ) : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ (५८, रा. मांजरी) यांचे सोमवारी सकाळी मांजरी परिसरातून अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. अपहरण केल्यानंतर उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. मात्र पोलिस पूर्ण क्षमतेने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती योगेश टिळेकर यांनी दिली आहे.

"काल माझ्या मामांचे अपहरण करून नंतर खून करण्यात आला. ही घटना घडल्यापासून पोलिस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करत आहे आणि पोलिस लवकरच या प्रकरणाचा सुगावा लावतील. या घटनेनं माझ्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून माझ्यासह आई आणि इतर सर्वजणच धक्क्यात आहेत," अशा शब्दांत योगेश टिळेकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा

मामांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती योगेश टिळेकर यांनी दिली आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमच्या पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून माझं सांत्वन केलं आणि पोलिस तपासाबाबत माहिती घेतली," असं टिळेकर यांनी सांगितलं आहे. 

नेमकं काय घडलं?

सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मांजरी परिसरातील एका हॉटेलजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ते उभे होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून अपहरणकर्ते तेथे आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना कारमध्ये बसवले. ही कार सोलापूरच्या दिशेने भरधाव निघून गेली. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. वाघ बराच वेळ झाले तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. वाघ यांचा मोबाइल बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. आमदार टिळेकर यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्वरित वाघ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या संपूर्ण भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी मांजरी परिसरातून वाघ यांचे अपहरण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. वाघ यांना घेऊन अपहरकर्ते सोलापूरच्या दिशेला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. हडपसर पोलिसांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस तसेच सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांना माहिती दिली. वाहनाचे वर्णन कळवले. हडपसर पोलिस ठाण्यासह शहर पोलिस दलाची पाच पथके व शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने तपास सुरू केला. खुनाचे नेमके कारण समजलेले नाही. हल्लेखोरांच्या शोधासाठी पुणे, नगर व सोलापूर परिसरात पोलिसांची पथके पाठवण्यात आली. वाघ यांचे कोणाशी वाद होते का, त्यांना कोणी धमक्या दिल्या आहेत का? याबाबतची माहिती पोलिसांनी मिळवली आहे.  

टॅग्स :Puneपुणेyogesh tilekarयोगेश टिळेकरBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी