शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 1:27 PM

माझ्या करिअरमध्ये मी बरीच नाटके रिप्लेसमेंट म्हणून केली.

ठळक मुद्देरस-भाव-रंजन नाट्यमहोत्सवाचे आयोजन

पुणे : नाट्यसृष्टीतील पदार्पण भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावरून झाले. माझ्या करिअरमध्ये मी बरीच नाटके रिप्लेसमेंट म्हणून केली. परंतु ज्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांच्या भूमिका वाट्याला आल्या. त्यांची कामे बघितली नसल्याने फ्रेश मनाने भूमिका साकारल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केली. शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आणि रोटरी इंडियाच्या शतकपूर्ती निमित्ताने रोटरी डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटी आणि भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्यावतीने दि. २२ डिसेंबरपर्यंत रस-भाव-रंजन नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविणाºया सुहासिनी देशपांडे, भारती गोसावी, रजनी भट, स्वरूपकुमार आणि राजन मोहाडीकर या कलाकारांचा सत्कार जोशी आणि भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी जोशी बोलत होते. रोटरीचे माजी प्रांतपाल विलास जगताप, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे कल्चरल संचालक संजय डोळे, भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे उपस्थित होते.‘भरत’च्या आठवणी उलगडताना मोहन जोशी म्हणाले, की १९६८ मध्ये सहावीत असताना येथे आलो. तेव्हा जयंत तारे यांच्या ‘टूणटूण नगरी’चे प्रयोग सुरू होते. त्यावेळी राजन मोहाडीकर नाटकात काम करीत होते. पण त्यावेळी त्यांना प्रयोग करणे शक्य नसल्याने मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. आज ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मान आहे. मोहन जोशी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचा सत्कार केल्यानंतर गोसावी यांनी जोशी यांना स्टेजवर नमस्कार केला. हा नमस्कार तुम्हाला नसून, तुमच्यातील स्वामी समर्थांना असल्याची भावना व्यक्त केली. या अनपेक्षित कृतीने मोहन जोशी क्षणभर अवाक् झाले.सुरुवातीस आनंद पानसे यांनी रस-भाव-रंजन नाट्यमहोत्सवाची माहिती दिली. ज्येष्ठ कलावंतांचा परिचय आणि सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. भरत नाट्यमंदिराचे विश्वस्त दीपक दंडवते आणि उपाध्यक्ष शिरीष फुले उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMohan Joshiमोहन जोशीTheatreनाटकcinemaसिनेमा