शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या प्रत्येक चित्रपटात दिव्यांगांना घेणार : प्रवीण तरडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 20:59 IST

दिव्यांग मुले ही प्रांजल व निर्मल मनाची असून परमेश्वराला या दिव्यांग मुलांनी हरवलेले आहे.

वानवडी : दिव्यांग मुले ही प्रांजल व निर्मल मनाची असून परमेश्वराला या दिव्यांग मुलांनी हरवलेले आहे. जसे आहात तसेच रहा . आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि प्रत्येक चित्रपटात दिव्यांग मुलगा किंवा मुलगी असेल असे आश्वासन देतो, असे चित्रपट, दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे यांनी सांगितले. वानवडीतील अपंग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र याठिकाणी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वार्षिकोत्सव कार्यक्रमात तरडे बोलत होते. वार्षिकोत्सहात दिव्यांग मुलांना जवळून भेटता आले व त्यांच्या कलेचा आस्वाद घेता आला. हा आनंद इतर कुठल्याही आनंदापेक्षा मोठा असल्याचे ते यावेळी बोलले.यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ध्यानमुर्ती रघुनाथ येमुल गुरुजी, अभिनेता प्रविण तरडे यांच्या हस्ते दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदिप रावत, कार्याध्यक्ष अँड मुरलीधर कचरे, उपकार्याध्यक्ष सतिश जैन, सचिव लता बनकर, प्रकाश टिळेकर, शंकर जाधव, व बाप्पुसाहेब जगदाळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या मुख्याध्यापिका शिवानी सुतार, शिक्षक, सेवक वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मंडळ सदस्य, मारुती राऊत उपस्थित होते. भाग्यश्री गोसावी यांनी सुत्रसंचालन केले व लता बनकर यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली......... वार्षिकोत्सव साजरा करत असताना पाहुण्यांच्या समोर दिव्यांग मुलांनी 'आम्ही ठाकर ठाकर व काठीन घोंगड.... या गाण्यावर नृत्याविष्कार केला तसेच योगासने, तबला वादन, सुर्यनमस्कार अशी प्रात्यक्षिके सादर केली. हे पाहून दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळत असून दिव्यांग मुले आता कुठेही कमी नाही, असे कौतुक पाहुण्यांनी केले.

दिव्यांग मुलांनी स्वागत गीत गात कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे यांनी प्रास्ताविकेत संस्थेच्या कायार्ची माहिती दिली. यावेळी संस्थेतर्फे दिला जाणारा 'दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार २०१९' सातारा येथील आनंद परिवार चँरिटेबल ट्रस्ट यांना येमुल गुरुजी व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटर कुणाल फणसे यांना प्रविण तरडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेPravin Tardeप्रवीण तरडेDivyangदिव्यांगcinemaसिनेमा