शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 3:43 PM

शहर काँग्रेसच्यावतीने पंडित भिमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देप्रदर्शनामध्ये इंदिरा गांधी यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीपर्यंतची छायाचित्रे वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर काँग्रेसतर्फे तयार करण्यात आला चित्ररथ

पुणे : गुजराथमध्ये जीएसटीमुळे व्यापारी रस्त्यावर आलेला आहे, बरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, हार्दिक पटेल सारख्या तरूणांवर दडपशाही सुरू आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत गुजराथच्या सत्तेमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी शनिवारी व्यक्त केले.शहर काँग्रेसच्यावतीने पंडित भिमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.मोहन प्रकाश म्हणाले, ‘‘सध्याच्या सरकारकडून लोकांना केवळ वर्तमानातच रहायला लावले जात आहे. मात्र या देशाला लाभलेला वैभवशाली इतिहासाला विसरता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशाला पाकिस्तानपासून मुक्त करून स्वतंत्र केले. त्यांच्या या कर्तृत्त्वाची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागली. सिक्किमला भारताचा अविभाज्य भाग बनविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. हा इतिहास आजच्या तरूण पिढीसमोर मांडला गेला पाहिजे. भारतीय उपखंडाचा इतिहास ज्यावेळी लिहला जाईल त्यावेळी इंदिरा गांधी यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहले जाईल.’’इंदिरा गांधीवरील छायाचित्र प्रदर्शनामध्ये त्यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीपर्यंत अनेक छायाचित्रे लावण्यात आली आहेत. यामध्ये अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. यातील अनेक छायाचित्रे आपणास पहिल्यांदाच पहायला मिळाल्याचे मोहन प्रकाश यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय छाजेड यांनी केले. यावेळी निता रजपूत, रमेश अय्यर, आनंद छाजेड, राजेंद्र खळदकर, शानी नौशाद, महेश गायकवाड, रणजित गायकवाड आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला आहे. यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या चित्ररथामध्ये एक एलसीडी स्क्रिन बसविण्यात आली आहे. हा चित्ररथ पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणे