शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:01 IST

राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालंय ते काही बदलणार नाही, किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्रातील या सहा कुटुंबाना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.  मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. 

असावरी म्हणाली, आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.  मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशा ठिकाणी मला जॉबमध्ये जागा मिळायला हवी. पुणे सोडून कुठेही जाता येणार नाही. पुण्यात जॉब असावा. राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालय ते काही बदलणार नाही. किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत. आमचं भविष्य अंधारमय झालय. पैशांनी गोष्टी मिळतात. पण माणूस म्हणून आधार मिळत नाही. त्यांनी मानसिक आधार दिला आहे. मी सरकारचे खूप आभार मानते. 

हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे - प्रगती जगदाळे 

अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत, मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही. लोक अजून आम्हाला भेटायला येत आहेत. आम्ही अजूनही त्या फायरींगच्या घटनेतच आहोत. असावरीला सरकारकडून आश्वासन मिळाली आहेत. म्हणून मी आनंदी आहे. पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आमची सगळ्या राजकीय लोकांना एक विनंती आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी बोलून आम्हाला मारलंय, आम्ही सगळं खर सांगितलं आहे. आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. त्याच राजकारण करू नका. त्यांनी गोळ्या झाडल्यावर मेंदू कसा बाहेर आला हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी माणुसकी म्हणून सर्वानी विचार केला पाहिजे. वक्तव्य करणं, बोलणं सोपं आहे. त्या घटनेत लहान मुलांनी जे सांगितलंय तेही खरं आहे. तुम्ही आमच्याशी वागू नका नका. आम्ही कुणीही काही खोटं बोलत नाही. तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नाही, हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं असावरीच्या आई प्रगती जगदाळे यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरkatrajकात्रजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार