शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटलं तरी शहाणपण नाहीच! कोरोना रुग्णांवर बहिष्कार टाकण्याच्या घटना सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 18:41 IST

पुण्यातील एका रहिवाशी महिलेने आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी आपल्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे.

पुणे : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून वर्ष झाल्यानंतर देखील रुग्णांवर बहिष्कार घालण्याच्या घटना घडतच आहेत. पुण्यातील एका रहिवाशी महिलेने सोसायटीच्या सदस्यांनी आपल्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे. सोसायटीच्या बोर्डावर आपले नाव लिहुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केल्याचे तसेच वारंवार ईमेल पाठवून आपल्याला त्रास दिल्याची तक्रार या महिलेने केली आहे. तर सोसायटीच्या सेक्रेटरीने मात्र या महिलेने आपण पॉझिटिव्ह असल्याचे लपवले तसेच त्या विलगीकरणाचे नियम पाळत नसल्याचा दावा केला आहे. 

पुण्यातल्या 'कोणार्क इन्द्रायु' या प्रशस्त सोसायटीमध्ये ही महिला राहायला आहे. या महिलेला फेब्रुवारीच्या शेवटी कोरोना झाला असल्याचे निदान झाले. या नंतर सोसायटी मध्ये बोर्डावर आपले नाव लिहिले गेले तसेच कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही ते हटवले गेले नाही असा दावा या महिलेने केला आहे. याबरोबरच आपल्याला वारंवार विलगीकरणाबाबत सूचना करणारे ईमेल्स पाठवून त्रास दिल्याचाही दावा या महिलेने केला आहे. 

'लोकमत'शी बोलताना त्या म्हणाल्या “ साधारण २२ दिवसांपूर्वी मला कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर माझे नाव सोसायटीच्या दारावर असलेल्या बोर्डावर लिहिण्यात आले. त्यावेळेस मी आक्षेप घेतला नाही. मात्र माझा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही हे नाव खोडायला नकार देण्यात आला. तसेच मला भेटायला येणाऱ्या नागरिकांनाही मनाई करण्यात आली. इतकेच नाही तर घरी काम करणाऱ्या लोकांनाही प्रवेश नाकारला गेला.माझा अहवाल प्रत्यक्षात दाखवावा अशी मागणी ते वारंवार करत राहिले. पण मी त्यांना माहिती देत होते. अहवाल दाखवण्याची जबरदस्ती ते करु शकत नाहीत असे मी त्यांना सांगितले.” 

सोसायटीच्या सेक्रेटरींनी मात्र या महिलेने आपण पॅाझिटिव्ह असल्याचे लपवल्यानेच हे पाउल उचलावे लागल्याचे म्हणले आहे. लोकमतशी बोलताना सौमित्र सेन सेक्रेटरी , कोणार्क इन्द्रायु ,म्हणाले “महिलेने कोरोना झाल्याची माहिती दिली नाही. तिचे मुले बाहेर खेळत होती. महापालिकेने आम्हाला कळाल्यानंतर हे स्पष्ट झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कळावे म्हणून आम्ही बोर्ड वर नाव लिहिले. विलगीकरणाची माहिती कळावी म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वी ६० तास घरकामगार देखील घरात जात होते. याने सगळ्यांना धोका होत होता. इतर सर्व लोकांना आम्ही मदत करत आहोत. फक्त या महिलेला त्रास होण्याचे कारण काय ?”

दरम्यान, आपण महापालिकेच्या सूचनेनुसार वागत होतो. त्यांनी सोसायटीच्या रहिवाशांना माहिती देऊ असे कळविले होते. मात्र, त्यांनी काही त्याबाबत कळविले नाही. तसेच ज्यादिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यादिवसापासूनच घर, कामगार महिलांना कामावर बोलावले नाही, असा दावा या महिलेने केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याHomeघरCrime Newsगुन्हेगारी