शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

‘असू जायबंदी जरी...’;जखमी सैनिकांची भावना : देशासाठी प्राण देण्याची आजही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:56 IST

माजी सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. निमित्त होते प्रजासत्ताकदिनाचे.

ठळक मुद्देआजही सैन्यात जाऊन शत्रुशी दोन हात करण्याची तयारीदेशासाठी लढून शारीरिक अंपगत्व पत्करणाऱ्या जवानांपासून प्रेरणा मिळावी यासाठी उपक्रम : बागूल

पुणे : लक्ष्मीनगर येथील कृष्णा सावंत, धानोरीतील आनंदराव घोडेस्वार, येरवडा येथील नरसिंग शिंदे तसेच गोरख जाधव, जे. एस. देसाई....., सगळे युद्धात जखमी झाल्यामुळे सैन्यातून निवृत्त झालेले. या सर्वांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे आजही सैन्यात जाऊन शत्रुशी दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या या जिद्दीलाच प्रजासत्ताकदिनी युवा कार्यकर्त्यांनी सलाम केला व तुमच्यातील देशप्रेमाचा अंश युवापिढीत येऊ द्या अशी प्रार्थनाही केली.ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निमित्त होते प्रजासत्ताकदिनाचे. या सर्व माजी सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या सर्वांनीच वेगवेगळे असतानाही देशासाठी आजही सिमेवर जाऊन लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. त्यांच्यातील हे साम्य पाहून सागर आरोळे, महेश ढवळे, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, धनंजय कांबळे, समीर शिंदे, योगेश निकाळजे, अशोक शिंदे, विक्रांत गायकवाड, दीपक देशपांडे  हे कार्यकर्तेही भारावून गेले.या शूरवीरांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी रांगोळीचा सडा, भारत मातेच्या प्रतिमेची प्रतिकृती उभारूली व त्यांच्या घरासमोर  राष्ट्रीय ध्वज उभारून जवानाच्या शौर्यप्रती आदर व्यक्त केला. जायबंदी असतानाही सर्वजण लष्कराच्या पेहरावात व छातीवर शौर्यपदके लावून उपस्थित होते हे विशेष! आबा बागूल यांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. प्रजासत्ताकदिनी झालेला हा सन्मान आमच्या व कुुटंबीयांच्या कायमच्या स्मरणात राहील अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. देशासाठी लढून शारीरिक अंपगत्व पत्करणाऱ्या शूर जवानांपासून प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला असल्याचे बागूल यांनी सांगितले.

एकात्मता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रजासत्ताक दिनानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यंदाही राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून दत्तवाडी पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या एकात्मता रॅलीला नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारे मुलांचे पेहराव, हातात तिरंगा व जयहिंदचा नारा यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.

टॅग्स :Aba Bagulआबा बागुलcongressकाँग्रेसPuneपुणेIndependence Dayस्वातंत्र्य दिवस