पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश

By नम्रता फडणीस | Published: March 13, 2024 04:25 PM2024-03-13T16:25:51+5:302024-03-13T16:26:21+5:30

लग्नानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेले घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी पती आणि त्याचे कुटुंबीय त्रास देऊ लागले होते

Even if the husband does not work the responsibility of the son and wife cannot be reduced Order to pay alimony of Rs | पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश

पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश

पुणे: पत्नी आयटी कंपनीत कामाला आहे. वडिलांनी लग्नाच्या वेळी घर तिच्याच नावावर केल्याने पतीसह त्याचे कुटुंबीय तिच्याच घरात राहते. पती कोणतेच काम करीत नाही. मुलगा आणि स्वतःचा सर्व खर्च तीच करते. पती आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणा-या मानसिक व शारीरिक छळामुळे पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करीत पोटगीची मागणी केली. त्यावर पती काम करीत नसला तरी तो मुलगा आणि पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही असा निष्कर्ष नोंदवित पत्नी व मुलाच्या देखभालीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला. पिंपरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एम. गिरी यांनी हा निकाल दिला.
      
राहुल आणि लीना ( नावे बदललेली आहेत) या दोघांचे २०१८ मध्ये मॅरेज झाले. लीना आयटी कंपनीत कामाला आहे. लग्न झाल्यापासूनच नोकरी न करता पती शेअर ट्रेडिंग चा बिझनेस करतो असा पत्नीचा समज आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. पतीने पत्नी व मुलासाठी कोणतेही आर्थिक योगदान दिलेले नाही तसेच कोणतीही आर्थिक सोय केलेली नाही .लग्नाच्या वेळी वडिलांनी मुलीला घर दिले. पण ते घर मुलीच्या नावावर केले. ते घर आपल्या नावावर करून देण्यासाठी पती आणि त्याचे कुटुंब लीनाला त्रास देऊ लागले. त्यामुळे पत्नीने अँड. प्रसाद विराज निकम यांच्या मार्फत कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली अर्ज दाखल केला होता. पती हा पत्नी व मुलाला सांभाळायची जवाबदारी झटकू शकत नाही. पत्नी चा सांभाळ ना करणं, तिचा अपमान करणं, तिला जेवण न देणं ह्या सर्व गोष्टी कौटुंबिक हिंसाचाराच्या अखत्यारीत येतात, असा युक्तिवाद अँड. निकम यांनी केला युक्तिवाद मान्य करत पत्नीचा पोटगी अर्ज मंजूर करण्यात आला. या प्रकरणात त्यांना अँड. मन्सूर तांबोळी, अँड तन्मय देव व अँड शुभम बोबडे यांनी सहकार्य केले.

लग्नानंतर पतीने पत्नी व मुलाचा सांभाळ करायचा असतो. असे असतानाही इकडे पती व मुलाचा सांभाळ पत्नीच करतीये. पती हा पत्नीला त्रास देण्याव्यतिरिक्त काही काम करत नाही. न्यायालयाने पतीला त्याच्या जबाबदारीची योग्य जाणीव करून देत पत्नीचा अर्ज मंजूर केला आहे - अँड. प्रसाद विराज निकम, पत्नीचे वकील

Web Title: Even if the husband does not work the responsibility of the son and wife cannot be reduced Order to pay alimony of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.